देश

काँग्रेसमध्ये होणार मोठा बदल?

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच समोर आले. यामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने विजय खेचून आणला. मात्र, काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही. त्यानंतर आता काँग्रेसमध्ये खांदेपालट केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये अल्का लांबा यांच्याकडे दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष चोप्रा यांनी त्याच दिवशी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद रिक्त आहे. मात्र, आता या पदावर 'आप'मधून पुन्हा काँग्रेसमध्ये येऊन घरवापसी केलेल्या दिग्गज नेत्या अल्का लांबा यांच्याकडे दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. 

कोण आहेत अल्का लांबा?

‘आम आदमी पक्षा’च्या बड्या नेत्यांमध्ये अल्का लांबा ऐननिवडणुकीत पक्षाला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये सहभागी झाल्या. मतदानाच्या दोनच दिवसांपूर्वी ‘आप’ कार्यकर्त्याला कानशिलात लगावण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या.

चांदणी चौकातून पराभव

चांदनी चौक मतदारसंघातून दिल्ली विधानसभा निवडणुकीत अल्का लांबा उतरल्या होत्या. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. 

2015 मध्ये विजयी

अल्का लांबा या 2015 मध्ये चांदणी चौक विधानसभा मतदारसंघातून ‘आप’च्या तिकिटावर विजयी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी भाजपच्या सुमन कुमार गुप्तांचा दारूण पराभव केला होता. 

सुभाष चोप्रांचा राजीनामा

मी पक्षाच्या कामगिरीची जबाबदारी घेतो, आम्ही यामागील कारणांचे विश्लेषण करु, अशी प्रतिक्रिया देत सुभाष चोप्रा यांनी दिल्ली काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: भारतीय सैन्याकडे पाहून साताऱ्यातील लष्करी कुटुंबे आनंदी : PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT