Home Minister Amit Shah Ahmedabad esakal
देश

Amit Shah : तुरुंगातील सगळेच कैदी स्वभावानं गुन्हेगार नसतात; गृहमंत्री अमित शहांचं मोठं विधान

'कधीकधी परिस्थिती त्याला गुन्हा करण्यास भाग पाडते.'

सकाळ डिजिटल टीम

'कधीकधी परिस्थिती त्याला गुन्हा करण्यास भाग पाडते.'

अहमदाबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आज एक दिवसीय गुजरात (Gujarat) दौऱ्यावर आहेत. वेळापत्रकानुसार, अमित शहांनी अहमदाबादमध्ये सर्वप्रथम स्मार्ट शाळांचं उद्घाटन केलं. यानंतर ते अखिल भारतीय जेल ड्युटी मीटमध्ये (All India Jail Duty Meet 2022) सहभागी झाले.

यावेळी बोलताना गृहमंत्री शहा म्हणाले, समाजाचा तुरुंगाकडं पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. तुरुंगातील प्रत्येक व्यक्ती स्वभावानं गुन्हेगार (Criminal) नसतो. कधीकधी परिस्थिती त्याला गुन्हा करण्यास भाग पाडते, असं त्यांनी स्पष्ट केलं. समाज नीटनेटका ठेवण्यासाठी गुन्हेगारांना शिक्षा होणंही गरजेचं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री म्हणाले.

'शिक्षा झाली नाही तर भीती राहणार नाही'

शिक्षा झाली नाही तर भीती राहणार नाही. जेव्हा भीती नसते, तेव्हा शिस्तही पाळता येत नाही. जे जन्मत: गुन्हेगार नाहीत, त्यांना बहाल करण्यासाठी तुरुंग प्रशासनानं पुढाकार घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. यापूर्वी अमित शहांनी अहमदाबादमध्ये 4 स्मार्ट शाळांचं उद्घाटन केलं. उद्घाटन समारंभात आपल्या भाषणादरम्यान गृहमंत्र्यांनी सांगितलं की, अहमदाबाद शहरात 22 अद्वितीय स्मार्ट शाळा तयार होत आहेत आणि यापैकी चार शाळा आज सुरू झाल्या आहेत. या शाळांच्या माध्यमातून 3200 हून अधिक विद्यार्थ्यांना लाभ मिळणार असल्याचंही शहा म्हणाले. एक दिवसीय दौऱ्यात गृहमंत्री अमित शाह अहमदाबाद, गुजरातमध्ये तीन कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who Is Dhruv Rathee? : जर्मनीत मेकॅनिकल इंजिनिअरिंग अन् Renewable Energy चं शिक्षण; ध्रुव राठी कसा बनला YouTuber? जाणून घ्या थक्क करणारा प्रवास

Vasota Fort Tourism : पर्यटकांची प्रतीक्षा संपली! सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील ऐतिहासिक वासोटा किल्ला 'या' तारखेपासून खुला, तब्बल चार महिने होता बंद, प्रवेश शुल्क जाहीर

Teacher Viral Video: मस्ती भोवली! विद्यार्थ्याच्या डोक्याला बनवले 'तबला'; व्हिडिओ व्हायरल होताच शिक्षकावर कारवाईचा हातोडा

Marathi News Live Updates : राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रकाश आंबेडकरांची घणाघाती टीका, एकहाती वर्चस्वाचा काळ संपल्याचा थेट इशारा

चार दिवसांपासून तापाने फणफणत, उपचारांअभावी ११ वर्षीय आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू; आश्रमशाळेतील ३ अधिकारी निलंबित

SCROLL FOR NEXT