नवी दिल्ली : मागील ५० वर्षांपासून इंडिया गेटवर धगधगणाऱ्या अमर जवान ज्योती (Amar Jawan Jyoti) राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये आज (२१ जानेवारी २०२२ रोजी) विलीन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) सन २०१९ मध्ये राष्ट्रीय युद्ध स्मारकाचं (national war memorial) उद्घाटन केलं होतं. अमर जवान ज्योतीमधील आग ही राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये तेवत ठेवलेल्या स्मारकापर्यंत आणली जाणार आहे. त्यानंतर इंडिया गेटवरील ज्वाला विझवण्यात येणार असल्याचा दावा केला जात आहे, तरी ही ज्योती तेवत ठेवली जाणार असल्याचं सरकारने स्पष्ट केलंय. मात्र यावरून आता राजकीय हेवेदावे सुरू असल्याचं चित्र निर्माण झालंय. काय फरक आहे 'अमर जवान ज्योती' आणि राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये? जाणून घ्या सविस्तर
१९७१ मध्ये भारत आणि पाक युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योतीची स्थापना करण्यात आली. या युद्धात भारताचा विजय झाला असून बांगलादेशची निर्मिती झाली. २६ जानेवारी १९७२ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी याचे उद्घाटन केले होते. इंडिया गेट येथील अमर जवान ज्योति सर्व जवानांच्या आणि सैनिकांच्या सम्मानासाठी एक स्मारक आहे.
देशातील हुतात्म्यांसाठी राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधण्यात आलेले असल्याने इंडिया गेटवर वेगळी ज्योत का पेटवायची? असा युक्तिवाद याआधी झाला होता, अशी माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिलीराष्ट्रीय युद्ध स्मारक हे ४० एकरांवर पसरलेलं आहे. या युद्ध स्मारकामध्ये स्वतंत्र भारतासाठी शहीद झालेल्या २६ हजारांहून अधिक भारतीय सैनिकांचं नाव कोरलेलं आहे. येथे एक राष्ट्रीय युद्ध संग्रहालयही आहे. 25 फेब्रुवारी 2019 रोजी या स्मारकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. नॅशनल वॉर मेमोरियलमध्ये सर्व भारतीय संरक्षण कर्मचार्यांची नावे आहेत ज्यांनी 1947-48 च्या पाकिस्तानसोबतच्या युद्धापासून ते गलवान खोऱ्यातील चिनी सैन्याशी झालेल्या संघर्षापर्यंत वेगवेगळ्या ऑपरेशन्समध्ये आपले प्राण गमावले. दहशतवादविरोधी लढाईमध्ये प्राण गमावलेल्या जवानांची नावेही स्मारकाच्या भिंतींवर लावण्यात आली आहेत. ब्रिटीश सरकारने 1914-1921 मध्ये ब्रिटीश भारतीय सेनेच्या सैनिकांच्या स्मरणार्थ इंडिया गेटची निर्मिती करण्यात आली होती. 1970 च्या दशकात पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धात भारत विजयी झाल्यानंतर शहीद झालेल्या सैनिकांना मानवंदना देण्यासाठी ‘अमर जवान ज्योती’ स्मारकाला मूर्त स्वरूप देण्यात आले होते. भारताविरोधात लढणाऱ्या देशातील 93 हजार सैनिकांनी आत्मसमर्पण केले होते. त्या घटनंतर दीर्घ कालखंडानंतर नरेंद्र मोदी सरकारतर्फे इंडिया गेटच्या परिसरात राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधण्यात आले होते.
इंडिया गेट परिसरात असणारी अमर जवान ज्योती यानंतर जळताना दिसणार नाही. त्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 'आपल्या वीर जवानांसाठी जी अमर जवान ज्योती तेवत होती, तिला आज विझवण्यात येईल, हे अत्यंत दुखद आहे. काही लोकांना देशप्रेम आणि बलिदानाचा अर्थ समजत नाही. मात्र आम्ही आपल्या सैनिकांसाठी अमर जवान ज्योति पुन्हा एकदा पेटवू असं राहुल गांधी म्हणाले.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.