Amarnath Attack: Bodies of Victims Airlifted to Delhi; Yatra to Continue 
देश

हल्ल्यानंतरही 'बम बम भोले'च्या गजरात भाविक यात्रेसाठी रवाना

वृत्तसंस्था

श्रीनगर - अमरनाथ यात्रेतील भाविकांवर सोमवारी रात्री दहशतवादी हल्ला होऊनही आज (मंगळवार) पहाटे भाविकांचा जत्था अमरनाथ गुफेकडे रवाना झाला. हल्ल्यानंतरही यात्रेकरुंच्या उत्साह कमी झाला नसल्याचे दिसत होते.

अनंतनाग जिल्ह्यातील बांटिगू भागात अमरनाथ यात्रेवर सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात यात्रेकरू ठार झाले. यात पाच महिलांचा समावेश आहे. या हल्ल्यात किमान 14 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर 'सीआरपीएफ'च्या जादा तुकड्या पाठविण्यात आल्या आहेत. या हल्ल्यात जखमी झालेल्या श्रीनगरला हलविण्यात आले आहे. तर, काही जणांना लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून दिल्लीला नेण्यात येणार आहे.

आज पहाटे तीनच्या सुमारास जम्मू बेस कॅम्पहून 3279 भाविकांचा जत्था पहलगाम आणि बालटालकडे रवाना झाला. यावेळी भाविकांनी बम बम बोले, हर हर महादेवच्या गजर करत आपला उत्साह कमी होऊ दिला नाही. हल्ल्यामुळे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, सर्व वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. अमरनाथ यात्रेवर यापूर्वी 2000 मध्ये हल्ला झाला होता. त्यानंतर आता पुन्हा हल्ला झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाड्यासह, कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता

Suryakumar Yadav: कान बंद करणे सोपे, अंमलबजावणी कठीण; सूर्यकुमार, कधी कधी चांगला सल्लाही ठरतो उपयोगी

Kolhapur Crime : आठवर्षीय चिमुकलीचा दुर्गावतार, स्वत:च्या अपहरणाचा हाणून पाडला प्रयत्न; कोल्हापुरातील नांदणीमध्ये थरारक घटना

Pune Weather: पुण्यात पावसाने घेतली दोन दिवसांची विश्रांती; पुढील दोन दिवसांत पुन्हा हलक्या सरींचा अंदाज

Ind vs Pak Asia Cup 2025 : भारत पाकिस्तान आज पुन्हा आमने-सामने; पायक्रॉफ्ट सामनाधिकारी म्हणून कायम राहणार?

SCROLL FOR NEXT