Ambulance stopped to make way for DMK minister 
देश

Video : मंत्र्याच्या ताफ्यासाठी रुग्णवाहिका थांबवली; नेटकरी संतापले

सकाळ डिजिटल टीम

चेन्नई - मंत्र्यांचा ताफा जाण्यासाठी रुग्णवाहिका काही काळ थांबल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. यावेळी मंत्र्यांच्या ताफ्यात डझनहून अधिक वाहने होती. त्यामुळे रुग्णवाहिकेतील रुग्णाला ताटकळत बसाव लागलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी संताप व्यक्त करत करत आहेत. (Ambulance briefly stopped to allow passage of Tamil Nadu Minister's convoy)

दरम्यान हा व्हिडीओ तामिळनाडू येथील असून तामिळनाडू सरकारमधील शिक्षणमंत्र्यांच्या ताफ्यासाठी रुग्णवाहिका थांबविण्यात आली होती. या ताफ्यात डझनहून अधिक वाहने होती. ही सर्व वाहने निघून जाईपर्यंत रुग्णवाहिकेला रोखून ठेवण्यात आलं होतं.

व्हिडीओमध्ये राज्याचे शालेय शिक्षण मंत्री अनबिल महेश पोय्यामोळी ज्या वाहनातून प्रवास करत होते त्या वाहनाला महिला पोलिस सलामी देताना दिसत होती. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया आल्या असून अनेकांनी याला चुकीचं म्हटलं आहे. अनेकांनी मंत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT