देश

कॉंग्रेसमधील वाद चिघळला; अमरिंदरसिंग-सिद्धू आमनेसामने 

वृत्तसंस्था

चंडीगड : पंजाब कॉंग्रेसमधील अंतर्गत कलह उफाळून आला असून, मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग विरुद्ध नवज्योतसिंग सिद्धू असे दोन उभे गट पडले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील कॉंग्रेस पक्षाच्या असमाधानकारक कामगिरीचे खापर सिद्धू यांच्यावर फोडण्यात आल्यानंतर त्यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीस सिद्धू यांनी दांडी मारत मला गृहीत धरू नका, असा स्पष्ट इशाराच पक्षश्रेष्ठींना दिला आहे. मध्यंतरी झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान नागरी भागातील पक्षाच्या अपयशाचे खापर अमरिंदरसिंग यांनी सिद्धू यांच्यावर फोडत त्यांच्याकडे सोपविण्यात आलेली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खात्याची जबाबदारीही काढून घेतल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांनी आज दुपारीच राज्यपालांना सिद्धू यांच्याकडील कॅबिनेट खाते काढून घेण्याची सूचना केली, सिद्धूंकडे पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालयाचाही कार्यभार आहे. आताही अमरिंदर यांनी सिद्धूंचे पंख कापून त्यांना सूचक इशारा दिल्याचे मानले जाते. सिद्धू पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, ""मला गृहीत धरले जाऊ शकत नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो अथवा जागतिक दर्जाचे समालोचन किंवा दूरचित्रवाणी शोज, या विविध क्षेत्रांमध्ये मी मागील चाळीस वर्षांत काम केले आहे.'' 

सिद्धूंची खंत 
लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे खापर माझ्या डोक्‍यावर फोडण्यात आले, जाणीवपूर्वक माझ्या खात्याचा उल्लेख करण्यात आला. अमरिंदरसिंग हे ज्येष्ठ असल्याने मी नेहमीच त्यांचे म्हणणे ऐकत आलो असून, त्यांनी मला दुखावले आहे. आता एकत्रित जबाबदारी कोठे आहे? मला वैयक्तिक बोलावून ते सांगू शकले असते; पण त्यांनी जाहीर भाष्य केले, अशी खंत सिद्धू यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT