Amit shaha  Amit shaha
देश

‘या’ दिवशी होणार जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका; शहांनी दिले उत्तर

सकाळ डिजिटल टीम

जम्मू-काश्मीरमध्ये जून २०१८ पासून राष्ट्रपती राजवट लागू आहे. त्यानंतर भाजपने मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. यामुळे लोकसभेत चर्चेदरम्यान काही सदस्यांनी काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीला होत असलेल्या विलंबावर चिंता व्यक्त केली होती. यावर जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका कधी होणार? याचे उत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी दिले.

जम्मू-काश्मीरमधील सीमांकन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि राजकीय पक्षांशी चर्चा केल्यानंतर विधानसभा निवडणुका (Elections) घेतल्या जातील, असे अमित शहा (Amit Shah) यांनी बुधवारी सांगितले. कलम ३७० रद्द करताना संसदेत जे काही बोलले होते ते सर्वांसमोर आहे आणि रेकॉर्डवर आहे, असे चर्चेला उत्तर देताना शहा म्हणाले.

जम्मू (Jammu) आणि काश्मीरमध्ये प्रथम पंचायत निवडणुका होतील. त्यानंतर सीमांकन व्यायाम होईल आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विधानसभा निवडणुका होतील. जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल केला जाईल. पंचायत निवडणुका हिंसाचाराशिवाय पार पडल्या. जिल्हा पंचायत निवडणुका पार पडल्या. सीमांकन प्रक्रिया पूर्णत्वाकडे आहे. मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, परिसीमन पूर्ण झाल्यानंतर आम्ही राजकीय पक्षांशी सल्लामसलत करून निवडणुका घेऊ, असेही अमित शहा (Amit Shah) म्हणाले.

जून २०१८ पासून राष्ट्रपती राजवट

जम्मू-काश्मीरमध्ये (Kashmir) जून २०१८ पासून राष्ट्रपती राजवट लागू आहे. त्यानंतर भाजपने मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. ऑगस्ट २०१९ मध्ये मोदी सरकारने जम्मू-काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले. जम्मू आणि काश्मीर आता विधानसभेसह केंद्रशासित प्रदेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D Y Patil Last Rites Mahadevrao Mahadik : डी. वाय. पाटील यांच्या अंत्यदर्शनासाठी महादेवराव महाडिकांची उपस्थिती; सतेज पाटील-महाडिकांची भेट

IND vs SL Live Streaming: भारत-श्रीलंका कसोटी मालिकेचे काउंटडाऊन सुरू! कुठे पाहता येणार सामने लाईव्ह? पाहा संपूर्ण डिटेल्स

Koyna Dam : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला; पाण्याची आवक घटली, 92.49 टीएमसी साठा

Kia Sorento: फॉर्च्यूनरला टक्कर! कियाची पहिली हायब्रिड SUV 'Sorento' लाँचसाठी तयार; प्री-बुकिंग सुरू!

Marathi Live Updates News: राज ठाकरे यांनी घेतले डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

SCROLL FOR NEXT