amit shah On sengol Says sengol  placed in new parliament building recite Jawaharlal Nehru tory
amit shah On sengol Says sengol placed in new parliament building recite Jawaharlal Nehru tory 
देश

Amit Shah On Sengol : अमित शाह म्हणतात, नेहरूंची ती परंपरा पुन्हा सुरू करणार! सांगितला 'राजदंड' स्वीकारण्याचा किस्सा

रोहित कणसे

देशातील नवीन संसद भनव इमारतीच्या उद्घाटनावरून सध्या राज्यात विरोधीपक्ष आक्रमक झाले आहेत. या कार्यक्रमावर देशातीव १९ विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. यादरम्या नया उद्घाटन सोहळ्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह यांनी माहिती दिली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करतील. यावेळी पंतप्रधान मोदी हे संसद भवन उभारण्यास हातभार लावणाऱ्या ६० हजार कामगारांचा देखील सन्मान करतील.

अमित शाह यांनी सांगितलं की संसद भवन लोकार्पण सोहळ्यात एका ऐतिहासिक घटनेची पुनरावृत्ती, सोबतच एका परंपरेला पुनरुज्जीवन देखील मिळत आहे.

अमित शाह म्हणाले की, नवीन संसदेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ऐतिहासिक परंपरा पुन्हा जिवंत केली जाईल. यामागे युगानुयुगे जोडलेली परंपरा आहे. याला तमिळमध्ये सांगोल असेही म्हणतात आणि याचा अर्थ संपत्तीने संपन्न. स्वतंत्र्याच्या अमृतमोहत्सवात प्रधानमंत्र्यांनी जे काही लक्ष ठरवले होते, त्यापैकी एक ऐतिहासिक परंपराचा सन्मान आणि पुर्नजागरण हे देखील होतं असे अमित शाह म्हणाले.

भारताला स्वंतत्र्य मिळालं तेव्हा ही परंपरा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वीकारली असल्याचं सांगत अमित शहा यांनी यामागील किस्सा देखील यावेळी सांगितला.

अमित शाह म्हणाले की, १४ ऑगस्ट १९४७ च्या रात्री एक मोठी घटना घडली. ज्याबद्दल देशातील अनेकांना माहिती नाही. सेंगोलने आपल्या इतिहासात खूप महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सेंगोल हे इंग्रजांकडून भारतीयांकडे झालेल्या सत्ता हस्तांतरणाचे प्रतिक बनले होते. या घटनेच्या ऐतिहासिक महत्वानंतर तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल की हे इतके दिवस आपल्यासमोर का आले नाही. पंतप्रधान मोदी यांनी या गौरवशाली परंपरेला लोकांसमोर आणण्यासाठी लोकार्पण दिवस निवडला असल्याचे शहा म्हणाले.

१४ ऑगस्ट १९४७ च्या रात्री १० वाजून ४५ मिनीटांनी पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी तामिळनाडूतून आलेले सेगोल स्वीकारले होते. त्यांनी इंग्रजांकडून भारतीयांना सत्ता मिळाल्याचे प्रतिक म्हणून पूर्ण विधी-विधानांसह ते स्वीकारले होते. नेहरूंनी १४ ऑगस्ट १९४७ च्या रात्री अनेक नेत्यांच्या उपस्थितीत सेंगोल स्वीकारलं आणि सत्ता हस्तातंरण प्रक्रिया पूर्ण केली. यामध्ये राजेंद्र प्रसाद देखील होते असे शाह म्हणाले.

ही घटना कशी घडली? तर भारताला स्वतंत्र्य देण्याचा निर्णय झाला तेव्हा ही प्रक्रिया निर्विघ्न पूर्ण करण्यासाठी व्हाइसराय म्हणून लॉर्ड माउंटबेटन यांना पाठवण्यात आलं. त्यांनी नेहरूंना सत्ता हस्तांतरणाचे प्रतिक म्हणून कोणत्या विशीष्ट परंपारिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जावं याबद्दल विचारणा केली. यावर नेहरूंनी विचार करण्यासाठी वेळ मागितला.

त्यानंतर नेहरूंनी त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा केली आणि अनुभवी स्वतंत्र्यसेनानी, विद्वान सी राजगोपालाचार्य यांच्यासमोर हा प्रश्न मांडला. त्यांनी जुन्या परंपरांचा आभ्यास करून सेंगोलच्या परंपरेबद्दल माहिती दिली. या प्रकारे सत्तांतरणांसाठी ही प्रक्रिया निवडण्यात आली. ही परंपरा स्वीकारून इग्रजांकडू सत्तेचं हस्तांतरण करण्यात आलं. हाच क्षण होता जेव्हा पंडित नेहरूंनी सेंगोल परंपरा स्विकरली असे शाह यांनी यावेळी सांगितलं.

सेगोल काय आहे?

दरम्यान इंग्रजांकडून १९४७ मध्ये भारतीय स्वातंत्र्यानंतर इंग्रजांकडून सत्ता हस्तांतर करण्यात आले. मात्र यानंतर सेंगोल राजदंड भारत सरकारने वापरला नाही. सेंगोल राजदंड अजूनही भारतीय राजाच्या सामर्थ्याचे आणि अधिकाराचे प्रतीक आहे. हे भारताच्या समृद्ध इतिहासाची आठवण करून देणारे असून ते देशाच्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. आता हा राजदंड नवीन संसदेच्या इमारतीत ठेवण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: दुसऱ्याच चेंडूवर राजस्थानला मोठा धक्का! जैस्वालला ४ धावांवरच झाला आऊट

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT