Union Home Minister Amit Shah addressing the Rajya Sabha amid fierce opposition, responding sharply to calls for PM Modi's presence in the House.  esakal
देश

Amit Shah Rajya Sabha Speech: ‘माझ्याशी तर निपटा, पंतप्रधानांना कशाला बोलावताय, आणखी त्रास होईल’’

Amit Shah challenges opposition in Rajya Sabha: केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राज्यसभेत विरोधकांच्या घोषणाबाजीवर केलं थेट आव्हान!

Mayur Ratnaparkhe

Amit Shah's Bold Statement in Rajya Sabha: संसदेच्या पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे आणि यामध्ये ऑपरेशन सिंदूरच्या मुद्य्यावर चर्चा सुरू आहे. मात्र चर्चा केवळ चर्चा न राहता यावरून जोरदार गदारोळ सुरू असल्याचं दिसत आहे.

या दरम्यान आज(बुधवार) गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच, यावेळी विरोधकांना त्यांनी एक आव्हानही केल्याचं दिसून आलं, ज्याची सध्या मीडियावर चर्चा सुरू आहे.

गृहमंत्री  अमित शाह यांच्या भाषणादरम्यान विरोधी पक्षाचे खासदार पंतप्रधान मोदींकडून उत्तर मागत होते. अनेक विरोधी सदस्य या मागणीसह सतत घोषणाबाजी करत होते. यावेळी अमित शाह यांनी त्यांना उद्देशून म्हटले की, माझ्याशी तर निपटा, तुम्ही पंतप्रधानांना का बोलावताय. आणखी त्रास होईल... यांना समजतच नाहीए. ’’

अमित शाह यांच्या भाषणादरम्यान बरीच घोषणाबाजी झाली. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, ‘’ऑपरेशन सिंदूरवर १६ तास चर्चा झाली. आम्ही अनेक प्रश्न उपस्थित केले, ज्यांची उत्तरे मिळाली नाहीत. ते म्हणाले की पंतप्रधानांनी राज्यसभेत त्यांचे विचार मांडावेत. पंतप्रधान येथे न येणे हा सभागृहाचा अपमान आहे.’’

याशिवाय अमित शहांच्या भाषणादरम्यान विरोधी सदस्यांनी सभागृहातून सभात्याग केला. त्यानंतर अमित शहांनी ऑपरेशन सिंदूर तसेच ऑपरेशन महादेव यावर आपले मत व्यक्त केले. तसेच, अमित शहा म्हणाले की विरोधी पक्षाची मागणी आणि भूमिका दोन्ही योग्य नाहीत.  तर विरोधी पक्षाच्या सभात्यागावर अमित शहा म्हणाले, ते का जात आहेत हे मला माहिती आहे? बहुतेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर तर, काँग्रेस पक्ष त्यांच्या विरोधी पक्षनेत्याला बोलू देत नाही आणि आता ते पंतप्रधान उत्तर देत नाहीत असा मुद्दा उपस्थित करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 5th Test: भारताचे जबरदस्त कमबॅक! मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णाच्या तिखट माऱ्यानंतर यशस्वी जैस्वालचा प्रहार

Prajwal Revanna : माजी पंतप्रधानांच्या नातवाने केले शेकडो महिलांचे लैंगिक शोषण; हजारो अश्लील व्हिडिओ, कोर्ट उद्या सुनावणार शिक्षा

IND vs ENG 5th Test: तू आम्हाला गप्प बसायला काय सांगतोस? KL Rahul भर मैदानात अम्पायरला भिडला! प्रसिद्ध कृष्णा-जो रूट यांच्या वादात उडी Video Viral

Onion Rate Decrease : कांदा दर घसरले! शेतकरी अडचणीत; साठवणुकीवर दिला जातोय भर

Mumbai News : योगेश कदम यांच्याकडून ‘सावली बार’ ऑर्केस्ट्राचा परवाना परत

SCROLL FOR NEXT