amit shah sakal
देश

Amit Shah Record: अमित शहांनी नोंदवला सर्वाधिक काळ गृहमंत्री पदावर राहण्याचा विक्रम!

Amit Shah sets record as longest-serving Home Minister: जाणून घ्या, अमित शहानंतर आता या यादीत दुसऱ्या क्रमांकावर कोण आहेत?

Mayur Ratnaparkhe

Amit Shah Creates History as Longest Serving Home Minister: गृहमंत्री अमित शहा यांनी एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. ते सर्वात जास्त काळ केंद्रीय गृहमंत्री राहणारे नेते बनले आहेत. अमित शहा यांनी केंद्रीय गृहमंत्री पदावर २ हजार २५८ दिवस पूर्ण केले असून, त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा विक्रम मोडला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांनी ३० मे २०१९ रोजी पदभार स्वीकारला होता. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) संसदीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कौतुक केले.

संसदेच्या चालू पावसाळी अधिवेशनातील गदारोळादरम्यान, सत्ताधारी एनडीए नेत्यांची आज संसद ग्रंथालय इमारतीत (पीएलबी) एक महत्त्वाची बैठक पार पडली. तर गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या कार्यकाळातील हा महत्त्वाचा टप्पा आज (५ ऑगस्ट)  गाठला आहे.

अमित शहा यांनी २०१९ मध्ये संसदेत कलम ३७० रद्द करण्याची घोषणा केली होती. ज्यामुळे जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा संपला. यासोबतच अमित शहा यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय मंजूर केले. त्यांची विधाने आणि विरोधकांना दिलेले योग्य उत्तर हे देखील त्यांच्या कामगिरीमधील वैशिष्ट्ये आहेत.

सर्वात जास्त काळ गृहमंत्रीपदावर राहण्याचा विक्रम भारतीय जनता पक्षाचे नेते लालकृष्ण अडवाणी आणि काँग्रेस नेते गोविंद बल्लभ पंत यांच्या नावावर होता. अडवाणी यांनी हे पद २,२५६ दिवस (१९ मार्च १९९८ ते २२ मे २००४) भूषवले, तर गोविंद बल्लभ पंत १० जानेवारी १९५५ ते ७ मार्च १९६१ पर्यंत एकूण ६ वर्षे ५६ दिवस गृहमंत्री होते. त्याच वेळी, या दोघांना मागे टाकत, ३० मे २०१९ पासून पदावर असलेल्या अमित शहा यांनी ४ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांचे गृहमंत्रीपदावर २ हजार २५८ दिवस पूर्ण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

Khandala Accident : खंडाळा घाटात भीषण अपघात; भरधाव टेम्पोचे नियंत्रण सुटले; ५ वाहनांना धडक; ट्रॅफिक अर्धा तास ठप्प!

SCROLL FOR NEXT