Amit Shah Esakal
देश

Manipur Violence:तेव्हा पंतप्रधान मणिपुरला कुठे गेले होते ? अमित शाह यांनी विरोधकांना विचारला थेट सवाल

Amit Shah on Manipur Violence: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी मणिपुर मुद्द्यावर विरोधकांचे चांगलेच कान टोचलेत. यावेळी गृहमंत्र्यांनी कॉंग्रेसच्या काळात झालेल्या हिंसाचाराचा दाखला दिला.

सकाळ डिजिटल टीम

Amit Shah on No Confidence Motion:राहुल गांधींनी लोकसभेत मणिपुरमध्ये घडलेल्या हिंसाचाराबद्दल सभागृहाचं लक्ष वेधून घेण्याच्या प्रयत्न केला. सर्व विरोधकांनीही या मुद्द्यावर सभागृहात मणिपुरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारावर चर्चा व्हायला पाहिजे. विरोधकांच्या एका शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी वेळही मागितला होता.

मात्र, आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी मणिपुर मुद्द्यावर विरोधकांचे चांगलेच कान टोचलेत. यावेळी गृहमंत्र्यांनी कॉंग्रेसच्या काळात झालेल्या हिंसाचाराचा दाखला दिला. त म्हणाले की कॉंग्रेसच्या काळात नागा-कुकी संघर्षामध्ये ७०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता, तेव्हा पंतप्रधान का बोलले नाहीत, असा सवाल शाहांनी सभागृहाला केला.

विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर बोलताना अमित शाहांनी सांगितलं की यापूर्वीच्या यूपीए सरकारने भांडणं लावायचं काम केलंय. मोदीं ९ वर्षात ५०पेक्षा जास्त वेळा नॉर्थइस्टला जाऊन आले आहेत. अमित शाह म्हणाले की मोदींनी नॉर्थईस्टला आपल्यासोबत जोडून ठेवण्याचं काम केलंय.

मणिपुर हिंसाचारावर बोलताना अमित शाह म्हणाले की विरोधकांच्या मणिपुरमधील मुद्द्याशी सहमत आहे आणि यावर ते सविस्तरपणे बोलू इच्छितात. अमित शाह म्हणाले की, "घडलेली घटना लाजीरवाणी आहे, पण यावर राजकारण करणं त्यापेक्षाही लज्जास्पद.

हे सरकार मणिपूर वर बोलायला तयार नाही हा भ्रम पसरवला जात आहे. पण मी पत्र लिहून चर्चेसाठी तयार असल्याचं सांगितलं, पण विरोधकांनी सदनात चर्चा करू दिली नाही. गृहमंत्री यांना मणिपूर बाबत बोलू दिलं जात नाही, ही कसली लोकशाही ?"

यावेळी बोलताना अमित शाहांनी कॉंग्रेसच्या काळातही मणिपुरमध्ये हिंसाचार झाला होता, असे वक्तव्य केले. ते म्हणाले की, "काँग्रेसचं सरकार असतांना तिथं नागा कुकी संघर्ष झाला होता. 700 लोक तेंव्हा मारले होते. तेव्हा ,उत्तर राज्यमंत्री यांनी दिल होत आणि हे पंतप्रधान का बोलत नाहीत असं म्हणत आहेत. इथं मी उत्तर द्यायला तयार आहे असं म्हणत असताना मला मात्र बोलू दिल नाही. मौन राखणारे तिथं बसले आहेत, आम्ही उत्तर देणारे आहोत. ही परिस्थितीजन्य हिंसा आहे, याला राजकीय जोड दिला नाही पाहिजे.(Latest Marathi News)

अमित शाहांनी यावेळी राष्ट्रपती राजवट लागू करण्यावरही भाष्य केलं. शाह म्हणाले की अनुच्छेद ३५६ तेव्हा लावतात जेव्हा तेथील सरकार सहकार्य करत नाहीत. पण इथे जर मुख्यमंत्री सहकार्य करत असतील, तर मुख्यमंत्री कसा बदलणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India: 'गौतम गंभीरचे अनेक शत्रू, ५ सिलेक्टर्सपैकी ४ जणं....' माजी संघसहकाऱ्याचं खळबळजनक दावा

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8व्या वेतन आयोगात ₹69,000 किमान वेतनासह जुनी पेन्शन योजनेचा प्रस्ताव

Petrol Diesel Rates update : पेट्रोल -डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका

खऱ्या आयुष्यातही सगळ्यांशी तुसडेपणाने वागतो समीर परांजपे; बायकोचा खुलासा, म्हणाली, 'आताची भूमिका सेम टू सेम'

Latest Marathi News Live Update: अश्विनी चेनानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

SCROLL FOR NEXT