captain amrinder singh on congress defeat Five states assembly election
captain amrinder singh on congress defeat Five states assembly election sakal
देश

पाच राज्यांतील काँग्रेसच्या पराभवाला फक्त गांधी कुटुंब जबाबदार - अमरिंदर सिंग

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : नुकत्याच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका (Five States Polls) पार पडल्या आहेत. यामध्ये काँग्रेसचा (Congress) दारुण पराभव झाला आहे. पण, या पराभवासाठी फक्त आणि फक्त गांधी कुटुंब जबाबदार असल्याचा आरोप पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Punjab Former CM Amrinder Singh) यांनी केला. तसेच काँग्रेस वर्किंग कमिटीवर देखील आरोप केले.

काँग्रेसचा पराभव केवळ पंजाबमध्येच नाही तर यूपी, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्येही झाला आहे. पक्षाच्या लाजिरवाण्या पराभवासाठी पूर्णपणे गांधी कुटुंब जबाबदार आहे. वस्तुस्थिती अशी आहे की देशभरातील लोकांचा गांधींच्या नेतृत्वावरील विश्वास उडाला आहे,”, असे अमरिंदरसिंग म्हणाले. पंजाबमधील काँग्रेसच्या पराभवासाठी पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वाद आणि सिद्धू यांच्या पक्षविरोधी विधानांना जबाबदार ठरवत आहेत. त्यावरून देखील अमरिंदर सिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या दिवशी काँग्रेस हायकमांडने नवज्योत सिंग सिद्धू यांसारख्या अस्थिर व्यक्तीला पाठिशी घालण्याचा निर्णय घेतला आणि चरणजीत सिंह चन्नी यांसारख्या भ्रष्ट व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून निवडले त्याच दिवशी काँग्रेसचा पंजाबमध्ये पराभव झाला होता, असं अमरिंदर सिंग म्हणाले.

मी २०१७ पासून पक्षासाठी प्रत्येक निवडणूक जिंकली. फेब्रुवारी २०२१ मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात देखील जिंकल्या. पण, काँग्रेस हायकमांड सर्व विसरले. सध्याच्या काँग्रेसला काहीही भविष्य नाही. मला काँग्रेसला स्पष्टीकरण देणे बंधनकारक नाही. पण, पंजाबच्या लोकांसाठी मी काँग्रेसच्या पराभवावर प्रतिक्रिया देत असल्याचं सिंग म्हणाले. तसेच त्यांच्या सरकारच्या कामगिरीचा अहवाल ते काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधींना पाठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मी काँग्रेस सोडणार असं कळल्यानंतर स्वतः सोनिय गांधी यांनी २०२२ च्या निवडणुकीत मी पक्षाचं नेतृत्व करावं असा आग्रह धरला होता, असंही सिंग यांनी सांगितलं.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी गेल्या वर्षी पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिद्धू यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि काँग्रेस पक्ष सोडला. त्यानंतर पक्षाने चरणजीत चन्नी यांची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली. अमरिंद सिंग यांनी पंजाब लोक काँग्रेस या नवीन पक्षाची स्थापना केली. पंजाबच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने बहुमत मिळवले. आता भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली पंजाबमध्ये आपची सत्ता स्थापन झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT