Amritpal Singh  
देश

Amritpal Singh : अमृतपालचा ठिकाणा शोधला ; रात्रभर राहिला PG मध्ये राहणाऱ्या तरुणीच्या खोलीत !

सकाळ डिजिटल टीम

खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंह अजूनही फरार आहे. पंजाब पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या मागावर आहेत. मात्र अृतपाल रोज त्याचे ठिकाण बदलत आहे. अमृतपाल राजधानी दिल्लीतील लक्ष्मी नगर भागातील रमेश पार्कमध्ये एक दिवस थांबला होता. अमृतपाल आणि त्याचा मित्र पप्पलप्रीत रमेश पार्कमधील पीजीमध्ये एका तरुणीच्या खोलीत राहत होते, असा पोलिसांचा दावा आहे. या तरुणीची आणि अमृतपालची किसान आंदोलनादरम्यान मैत्री झाली होती.

सध्या पंजाब पोलीस आणि दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल त्या मुलीची चौकशी करत आहे.शेतकरी आंदोलनादरम्यान मुलगी आणि पप्पलप्रीत यांची भेट झाल्याचा दावा पोलीस सूत्रांनी केला आहे. तेव्हापासून दोघांमध्ये मैत्री होती. पप्पलप्रीत आणि अमृतपाल २० मार्च रोजी तिच्याकडे आले होते.

दिल्लीतील एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागला आहे. या फुटेच्या आधारे पोलिसांनी त्या तरुणीचा शोध घेतला आहे. या फुटेजमध्ये दोन युवक दिसतात, दोघांनी मास्क लावला आहे. यामध्ये एक व्यक्ति अमृतपाल तर दुसरी व्यक्ती पप्पलप्रित असल्याचे सांगण्यात येत आहे.

सीसीटीव्ही फुटेज पोलिसांसमोर आल्यानंतर पोलिसांनी लक्ष्मीनगर परिसरात तपास सुरू केला. यानंतर पोलीस एका पीजीमध्ये पोहोचले आणि त्यामध्ये राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीची या फुटेजबाबत चौकशी करण्यात आली. फुटेजमध्ये दिसणारे दोन तरुण अमृतपाल आणि पप्पलप्रीत असल्याची पुष्टी त्यांनी केली आहे. २० मार्च रोजी दोघेही आपल्या खोलीत आले होते आणि रात्रभर येथे राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी २१ मार्च रोजी दोघे निघून गेल्याचेही तिने पोलिसांना सांगितले.

कशी झाली ओळख?

तरुणीने पोलिसांना सांगितले की, शेतकरी आंदोलनादरम्यान तीही आंदोलकांमध्ये जायची आणि तिथे तिची पप्पलप्रीतशी भेट झाली. दोघांमध्ये मैत्री होती आणि याच कारणामुळे तिची पप्पलप्रीतच्या माध्यमातून अमृतपालशी भेटही झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Union Election : गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार?; माजी अध्यक्ष अरुण डोंगळेंच्या मनातलं ओठावर आलं

भाजपने पक्षसंघटनेत केले मोठे बदल, महाराष्ट्रातील चार नेत्यांवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी

न्यूड व्हिडीओ लीक झाल्यानंतर राधिका आपटेला घराबाहेर पडणंही झालं होतं कठीण; म्हणाली, ‘मी खूप घाबरले होते…’

Marathi News Live Updates : बहुचर्चित सातारा जिल्हा बँक निवडणुकीचा अखेर बिगुल; १ नोव्हेंबरला मतदान, ३ नोव्हेंबरला मतमोजणी

Kolhapur Land Fraud : मळवीवाडी जमीनप्रकरणी आरोपीची जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी;शिक्का ताब्यात, वरिष्ठांनी घेतली माहिती

SCROLL FOR NEXT