BSF Jawan esakal
देश

BSF जवानाच्या गोळीबारात 4 जवान शहीद; कोर्टाकडून अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश

सकाळ डिजिटल टीम

ज्या जवानांना गोळ्या घालून ठार केलं, त्यात त्याचा मित्रही होता.

अमृतसर : 6 मार्चला पंजाबमधील अमृतसर इथं बीएसएफच्या (BSF) 144 बटालियनच्या मुख्यालयात बीएसएफ जवानानं केलेल्या गोळीबारात 4 जवान शहीद झाले होते. या घटनेत एक जवानही गंभीर जखमी झाला आहे.

आपल्या साथीदारांवर गोळ्या झाडल्यानंतर, बीएसएफ जवान सत्ताप्पा सिद्धप्पा (Satteppa Siddappa) यांनी स्वत:वरही गोळी झाडली. यानंतर आता बीएसएफच्या कोर्ट ऑफ इन्क्वायरीनं पाच अधिकारी आणि एका व्यक्तीवर विभागीय कारवाईची शिफारस केलीय. यामध्ये मुख्य वैद्यकीय अधिकारी (CMO) आणि डेप्युटी कमांडंटचा समावेश आहे. सत्ताप्पाच्या मानसिक स्थितीकडं दुर्लक्ष केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

या घटनेच्या तपासात असं आढळून आलंय की, आरोपी बीएसएफ कॉन्स्टेबल सत्ताप्पाला गोळीबाराच्या 15 मिनिटं आधी म्हणजेच, सकाळी 9.30 च्या सुमारास युनिट हॉस्पिटलमधून सोडण्यात आलं. त्यानंतरच त्यानं साथीदारांवर गोळीबार केला होता. त्यानं ज्या लोकांना गोळ्या घालून ठार केलं, त्यात त्याचा मित्रही होता. जो सत्ताप्पाची काळजी घेत असतं. रतनलाल नावाच्या या जवानानं घटनेच्या तासाभरापूर्वी साताप्पाला नाश्ताही दिला होता, असंही कळतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT