Andhra Minister Goutham Reddy Passes away esakal
देश

Andhra Pradesh : कॅबिनेट मंत्र्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

सकाळ डिजिटल टीम

'कॅबिनेट मंत्री राज्यात गुंतवणूक वाढवण्यासाठी दुबईला गेले होते.

आंध्र प्रदेश सरकारमधील (Government of Andhra Pradesh) कॅबिनेट मंत्री गौतम रेड्डी (Gautam Reddy) यांचं आज (सोमवार) हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. माहितीनुसार, गौतम रेड्डी (वय 50) राज्यात गुंतवणूक वाढण्यासाठी दुबईला गेले होते आणि रविवारीच ते हैदराबादला (Hyderabad) परतले. दरम्यान, रेड्डी घरीच बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना तातडीनं ज्युबली हिल्स अपोलो रुग्णालयात (Jubilee Hills Apollo Hospital) दाखल करण्यात आलं. मात्र, त्यांची प्राणज्योत मालवली. रेड्डींच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांनी दु:ख व्यक्त केलंय. गौतम हे तरुणांचं चांगलं नेतृत्व होतं. त्यांच्या निधनामुळं पक्षाचं मोठं नुकसान झालंय, असं ते म्हणाले.

गौतम रेड्डी गेल्या आठवड्यातच अबू धाबीला (Abu Dhabi) गेले होते. तिथं राज्यात गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी आंध्र सरकारनं दुबई ऑटो एक्सपोमध्ये 'अबू धाबी रोड शो' या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. इथं त्यांनी अनेक व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांची भेट घेतली.

गौतम रेड्डी 2014 मध्ये पहिल्यांदाच 'आमदार'

रेड्डी हे आंध्र प्रदेशमधील नेल्लोर जिल्ह्यातील आत्मकुरु विधानसभा मतदारसंघाचे (Atmakuru Assembly constituency) आमदार होते. ते माजी खासदार राजामोहन रेड्डी (Rajamohan Reddy) यांचे पुत्र होते. 2014 मध्ये रेड्डी आत्मकुरू येथून पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले. 2019 मध्येही ते पुन्हा निवडून आले आणि YSR काँग्रेसच्या पहिल्या सरकारमध्ये मंत्री झाले. दरम्यान, गौतम रेड्डी यांच्या मृत्यूबाबत रुग्णालयानं एक निवेदन जारी करत त्यांच्या निधनाची माहिती दिलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT