Andhra Pradesh esakal
देश

धक्कादायक! गर्भवती महिलेवर पतीसमोरचं नराधमांनी केला सामूहिक बलात्कार

सकाळ डिजिटल टीम

बापटला जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आलीय.

जगात घृणास्पद कृत्य करणार्‍या क्रूर लोकांची लोक कल्पनाही करू शकत नाहीत. ही घटना ऐकून तुमच्या तळपायाची आग मस्तकाला जाईल. आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) बापटला जिल्ह्यात (Bapatla District) अतिशय धक्कादायक घटना समोर आलीय. येथील रेपल्ले रेल्वे स्टेशनवर (Repalle Railway Station) गर्भवती महिलेचा (Pregnant Woman) तिच्या कुटुंबीयांसमोर सामूहिक बलात्कार (Gang Rape) करण्यात आलाय. तीन नराधमांनी हे लाजिरवाणं कृत्य केलंय.

दरम्यान, आरोपींनी महिलेच्या पतीला बेदम मारहाण केलीय. त्यांनी आरडाओरडा करत रेल्वे पोलिसांची (Railway Police) मदत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना मदत मिळू शकली नाही. सध्या या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून एका अल्पवयीन मुलासह तीन आरोपींना अटक करण्यात आलीय. शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री हे कुटुंब कामाच्या शोधात गुंटूरहून कृष्णा जिल्ह्यात जात असताना ही घटना घडलीय. हे कुटुंब प्रकाशम जिल्ह्यातील आहे.

पोलिसांनी रविवारी सांगितलं की, प्रकाशम जिल्ह्यातील येरागोंडापलेम येथील रहिवासी असलेलं एक जोडपं कृष्णा जिल्ह्यातील नागयलंका गावात शेतीच्या कामासाठी जात असताना शनिवारी रात्री रेपल्ले रेल्वे स्थानकावर ते दोघे रेल्वेतून उतरले. रविवारी सकाळी दोघेही नागयलंकाकडे जाताना फलाटावर झोपले. त्यानंतर तिघेजण तिथं आले आणि त्यांनी महिलेच्या पतीला बेदम मारहाण केली आणि रेल्वे प्लॅटफॉर्मवरचं महिलेवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिघांनी दाम्पत्याकडून पैसे हिसकावून घटनास्थळावरून पळ काढलाय. दरम्यान, मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी (Y. S. Jagan Mohan Reddy) यांनी बापटलाच्या एसपीशी बोलून आरोपींना लवकरात-लवकर अटक करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asim Sarode: असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द; 'हे' वादग्रस्त विधान भोवलं

Priyanka Gandhi: हवाप्रदूषण कमी करण्यासाठी एकत्र काम करू; खासदार प्रियांका गांधी वद्रा यांचे केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला आवाहन

Latest Marathi News Live Update : महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी फलटण पोलीस ठाण्याबाहेर सुषमा अंधारेंकडून ठिय्या

मित्रांसोबत दारू प्यायला जाताय? मग पुष्कर श्रोत्रीने सांगितलेले 'हे' चार नियम नक्की पाळा, म्हणतो- माझे वडील म्हणाले...

Supreme Court : 'महाकाल मंदिरासाठी आमची 200 वर्षे जुनी मशीद पाडली'; मुस्लिम पक्षाची सर्वोच्च न्यायालयात धाव, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT