देश

'अण्णा भाऊं'चा होणार महापुरुषांच्या यादीत समावेश; आठवलेंची घोषणा

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे (Anna Bhau Sathe) यांचा महापुरुषांच्या यादीत समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी याची घोषणा केली. यासंदर्भात आठवले यांनी अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यानंतर अण्णा भाऊंच्या नावाचा यादीत समावेश होईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. दैनिक सकाळनं यासंदर्भात 'अण्णा भाऊ साठेंची अवहेलना' या मथळ्याखाली पहिल्यांदा वृत्त दिलं होतं. (Anna Bhau Sathe will be in list of great men Ramdas Athavale announcement)

अधिकाऱ्यांना काय म्हणाले आठवले?

अण्णा भाऊ साठे जे दलित समाजातील मोठे साहित्यकार होते. यांच्या जयंतीला निधी उपलब्ध होण्याबाबत मागणी करणारं एक पत्र आंबेडकर फाऊंडेशनकडे आलं होतं. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत कबीर यांच्या जयंतीला २ लाख रुपयांची मदत केली जाते, त्याचधर्तीवर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीला देखील आपण मदत केली पाहिजे, असं सांगितलं. आठवलेंच्या या सुचनेवर तुम्ही अर्ज पाठवून द्या आम्ही निधीबाबतची सर्व कार्यवाही करुन घेऊ, असं आश्वासन या अधिकाऱ्यांनी दिलं. मंत्री रामदास आठवले यांनी फोनवरुन या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यामुळं आता अण्णा भाऊ साठे यांचा महापुरुषांच्या यादीत समावेश होण्याचा आणि यासंदर्भात दिल्या जाणाऱ्या निधीचा मार्ग मोकळा झाला आहे.

आंबेडकर फाउंडेशननं म्हटलं होतं की, महापुरुषांच्या यादीत अण्णा भाऊंचं नाव समाविष्ट करण्यासाठी त्यांचं कार्य निकषांमध्ये बसत नाही. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या बऱ्याच योजना आहेत. विविध राष्ट्रपुरुषांच्या जयंती उत्सवासाठी या फाउंडेशनच्या माध्यमातून २ लाख रुपयांची मदत देण्यात येते. या फाउंडेशनच्या महापुरुषांच्या यादीत बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, कबीर, संत चोखामेळा, संत वाल्मिकी, संत रविदास अशा अनेक महापुरुषांच्या नावाचा या यादीत समावेश आहे. पण अण्णा भाऊ साठे यांच्यासंदर्भात यापूर्वी अशी मागणी झाली नव्हती, असंही यावेळी आठवले यांनी सांगितलं.

दरम्यान, पहिल्यांदाच अण्णा भाऊ साठे यांचं नाव महापुरुषांच्या यादीत समाविष्ट करण्याची मागणी झाली तर त्याकडे सकारात्मक पद्धतीनं पाहण गरजेचं होतं. पण अधिकाऱ्यांना त्यांच्याबाबत पुरेशी माहिती नसल्यानं त्यांनी चुकीचं उत्तर दिलं. ही बाब चुकीची आहे, आण्णाभाऊंबाबत अनादर व्यक्त करण्याचा जो प्रयत्न झाला त्याची मी ताबडतोब दखल घेतली असून अण्णा भाऊंच्या नावाचा उल्लेख यादीत करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असं स्पष्टीकरण यावेळी मंत्री रामदास आठवले यांनी दिलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुरात शतकाच्या उंबरठ्यावर, सीएसके गाठणार का 200 चा टप्पा

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

SCROLL FOR NEXT