akhilesh yadav sakal
देश

अपर्णा यादववरून अखिलेश यांनी सोडले मौन; म्हणाले...

भाजपला आमच्या कुटुंबाची जास्त काळजी आहे. पण, याची गरज नाही

सकाळ डिजिटल टीम

मुलायम सिंह यादव यांची सून अपर्णा यादव (Aparna Yadav) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या मागील काही दिवसांपासून येत आहे. ही आमच्या कुटुंबाची बाब आहे आणि सर्व ठीक आहे, असे सपा प्रमुख (samajwadi party) अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले. भाजपला आमच्या घराण्याची जास्त काळजी आहे. निवडणुकीत केले जाणारे सर्व कारस्थान यशस्वी होऊ देणार नाही, असे यादव म्हणाले.

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत, तसतसे नेत्यांमधील पक्षांतराचा काळही तीव्र झाला आहे. अलीकडच्या काळात विद्यमान आमदार स्वामी प्रसाद मौर्य, डॉ. धरमसिंह सैनी आणि दारा सिंह चौहान यांच्यासह अनेक नेते आणि आमदारांनी भाजपमधून सपामध्ये प्रवेश केला, तर इतर अनेक नेत्यांनी स्वतःच्या महत्त्वाकांक्षा लक्षात घेऊन पक्ष बदलला.

दरम्यान, अखिलेश यादव यांच्या घरातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. नेताजी म्हणजेच मुलायमसिंह यादव यांची धाकटी सून आणि अखिलेश यांचे धाकटे भाऊ प्रतीक यांची पत्नी अपर्णा यादव (Aparna Yadav) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. या बातम्यांना पूर्णविराम देताना अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी ही त्यांच्या कुटुंबाची बाब आहे आणि सर्व ठीक आहे, असे सांगितले.

भाजपला आमच्या कुटुंबाची जास्त काळजी

अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त दिशाभूल करणारे आहे. भाजपला आमच्या कुटुंबाची जास्त काळजी आहे. पण, याची गरज नाही. उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी मोठमोठे षडयंत्र आणि कारस्थान केले जात आहे. मात्र, त्यांना यात यश येणार नाही, असेही अखिलेश यादव (Akhilesh Yadav) म्हणाले.

आधी पक्षासाठी काम करा, मग आशा बाळगा

रविवारी प्रगतिशील समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवपाल सिंह यादव यांनी अपर्णा यादव यांची भेट घेऊन त्यांना सपामधूनच निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला होता. आधी पक्षासाठी काम करा, मग काही आशा बाळगा, असे शिवपाल म्हणाले. तसेच त्यांनी समाजवादी पक्षातच (samajwadi party) राहावे, असेही सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT