Apple CEO Tim Cook meets Prime Minister Narendra Modi tweets thank you to PM  
देश

Apple च्या सीईओनी घेतली PM मोदींची भेट; देशभरात गुंतवणूकीची केली मोठी घोषणा

रोहित कणसे

भारतात आलेले Apple चे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांच्या जल्लोषात स्वागताबद्दल आभार मानले आहेत.

या क्षेत्रात करणार गुंतवणूक

अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी याबद्दल ट्वीट करत माहिती दिली आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्साहात स्वागत केल्याबद्दल धन्यवाद. भारताच्या भवितव्यावर प्रभाव टाकणारा तंत्रज्ञान, शिक्षण, उत्पादकता आणि पर्यावरण या बद्दलचा तुमचा सकारात्मक दृष्टिकोन आम्ही पुढे नेऊ. आम्ही देशभरात वाढ आणि गुंतवणूक करण्यासाठी वचनबद्ध आहोत, असे टिम कूक म्हणाले आहेत.

अॅपलचे सीईओ टिम कुक त्यांच्या भारत दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात दिल्लीत आले आहे, जिथे कंपनीचे देशातील दुसरे अधिकृत रिटेल स्टोअर गुरुवारी लाँच केले जाईल. त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राजकीय दिग्गजांची भेट घेतली. कूक गुरुवारी राजधानी दिल्लीत दुसऱ्या स्टोअरच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत. त्यांनी क्राफ्ट्स म्युझियम आणि प्रसिद्ध लोधी आर्ट डिस्ट्रिक्टला भेट दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT