arvind kejriwal Latest News arvind kejriwal Latest News
देश

Gujarat Election : अमित शाहांना मुख्यमंत्री बनवणार? केजरीवालांचा भाजपला प्रश्न

आप गुजरातमध्ये पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरताना दिसत आहे

सकाळ डिजिटल टीम

arvind kejriwal and Amit Shah News नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमधील विधानसभा निवडणुकीबाबत नवी चर्चा सुरू केली आहे. भाजप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना (Amit Shah) गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित करणार आहे का, असा प्रश्न अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी विचारला आहे. सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कामावर पक्ष नाराज आहे का, असा सवालही त्यांनी केला.

‘गुजरातमध्ये आम आदमी पार्टी वेगाने वाढत आहे. भाजप घाबरला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप अमित शाह (Amit Shah) यांना गुजरातचा मुख्यमंत्री चेहरा म्हणून घोषित करणार आहे हे खरे आहे का? भूपेंद्रभाई पटेल यांच्या कामावर भाजपही नाराज आहे का?’, असे ट्विट अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी हा दावा अशावेळी केला आहे, जेव्हा ते आपला पक्ष मजबूत करण्यासाठी गुजरातमध्ये (Gujarat) सतत दौरे करीत आहे. दरमहा ३०० युनिट मोफत वीज आणि ५ वर्षांत सर्व तरुणांना नोकऱ्या अशा लोकभावना आश्‍वासनांच्या जोरावर भाजपचा (BJP) बालेकिल्ला फोडण्याचा प्रयत्न करीत आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये सरकार स्थापन करणारा हा पक्ष आता गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी करीत आहे.

यावर्षी विधानसभेच्या निवडणुका

गुजरातमध्ये यावर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यावेळी आप राज्यात पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरताना दिसत आहे. त्यामुळेच अरविंद केजरीवाल सातत्याने गुजरात दौऱ्यावर आहे. यासह पंजाबमध्ये आपचे सरकार आल्यानंतर केजरीवाल गुजरातमध्येही दिल्लीचे मॉडेल मांडत आहे.

उमेदवारांची पहिली यादी जाहीर

आपने गुजरातमधील उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर केली आहे. गुजरातचे अध्यक्ष गोपाल इटालिया यांनी सांगितले की, ते आणि इसुदान गढवी दोघेही निवडणूक लढवणार आहेत. याशिवाय शेतकरी नेते भीमाभाई चौधरी, समाजसेवक जगमल वाला, आदिवासी समाजाचे नेते अर्जुन राठवा, शेतकरी नेते सागर रबारी, दलित नेते वसराम सागठिया, सामाजिक कार्यकर्ते राम धाडक, व्यापारी नेते शिवलाल बरासिया, सुधीर वाघानी, राजेंद्र सोलंकी, ओमप्रकाश तिवारी यांना उमेदवारी मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे जिल्ह्यातील १६ धरणे १०० टक्के भरली; खडकवासला, माणिकडोहचा पाणीसाठा सर्वात कमी

Latest Marathi News Update : कोल्हापुरातील कॉम्रेड उदय नारकर यांना जीवे मारण्याचे धमकी

INDW vs SA W World Cup Final: भारत-दक्षिण आफ्रिका फायनल किती वाजता अन् कुठे Live पाहता येणार? जाणून घ्या नवी मुंबईतील हवामानाचा अंदाज

Gold Rate Today : तुळशी विवाहादिवशी सोने झाले आणखी स्वस्त, चांदीही घसरली, जाणून घ्या आजचा ताजा भाव

Soybean Procurement Nagpur: अखेर हमीभावात सोयाबीन खरेदीचा मुहूर्त ठरला; पोर्टल सुरू, नऊ केंद्रांना मंजुरी, सोमवारपासून नोंदणी

SCROLL FOR NEXT