देश

CM चन्नी, अमित शहा एकत्र; केजरीवालांच्या 'त्या' वक्तव्यामुळे वाद पेटला

पंजाब निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केजरीवालांच्या अडचणीत वाढ

सुधीर काकडे

पंजाब विधानसभा निवडणुका (Punjab Assembly Elections 2022) तोंडावर येऊन ठेपल्या असताना पंजाबमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यातच आम आदमी पक्षाचे (AAP) सर्वेसर्वा अरिवंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केलेलं वक्तव्य आणि कुमार विश्वास (Kumar Vishwas) यांनी केलेल्या आरोपांमुळे त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसतेय. केजरीवाल यांनी खलिस्तानी (Khalistan) संघटनांबद्दल काही धक्कादाय वक्तव्य केल्याचा आरोप त्यांचे माजी सहकारी कुमार विश्वास यांनी केलाय. तर त्याविरुद्ध आता पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे एकत्र आल्याचे दिसत आहेत.

अरविंद केजरीवाल यांच्या वादग्रस्त वक्तव्याची चौकशी करण्याची मागणी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी केली होती. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केजरीवालांच्या या वक्तव्याची चौकशी होईल असं सांगितलं आहे. त्यामुळे अमित शहा आणि चन्नी यांनी केजरीवालांना घेरण्याचं काम केल्याचं दिसतंय. तर मुख्यमंत्री केजरीवाल यांनीही केंद्र सरकार आणि चन्नींना धारेवर धरलंय.

केजरीवाल म्हणाले की, देशाच्या सुरक्षेच्या विषयाची थट्टा केलीय. पुढच्या काही दिवसांत एनआयए माझ्याविरोधात FIR दाखल करेल, मात्र मी त्या कारवाईचं स्वागत करेल. या प्रकरणात चन्नी आणि अमित शहांवर निशाणा साधताना केजरीवाल म्हणाले की, सगळे एक झाले आहेत. मोदी, राहुल, प्रियंका हे म्हणताय की, केजरीवाल गेल्या 10 वर्षापासून देशाचे दोन तुकडे करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही तर थट्टा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

Latest Marathi News Live Update : धुळे शहरासह परिसरामध्ये तब्बल सहा ते सात दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर आज पावसाने लावली हजेरी

SCROLL FOR NEXT