Arvind Kejriwal 
देश

Arvind Kejriwal : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केजरीवाल अ‍ॅक्शन मोडमध्ये! ' या' अधिकाऱ्याला हटवले

Sandip Kapde

Arvind kejriwal : दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील अधिकारांच्या लढाईवर सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठाने आज (11 मे) रोजी निकाल सुनावला. सुप्रीम कोर्टाने आप सरकारला मोठा दिलासा देत केंद्र सरकारला दणका दिला आहे.

दिल्लीतील सेवांचा आधिकार दिल्ली सरकारलाच असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. CJI डी वाय चंद्रचूड यांनी या निकालाचं वाचन केलं. दरम्यान या निकालानंतर केजरीवाल सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. दिल्ली सरकारने सेवा सचिव आशिष मोरे यांना हटवले आहे. एबीपी हिंदीने याबाबत वृत्त दिले आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, आता इथे कामाला गती येईल कारण आधी त्यांचे हात बांधलेले होते. जनतेच्या कामात अडथळा आणणाऱ्या अधिकाऱ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील.

दिल्ली सचिवालयात मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, "सार्वजनिक कामात अडथळा आणणाऱ्या अधिकाऱ्यांना येत्या काही दिवसांत त्याचे परिणाम भोगावे लागतील. माझे हात बांधून मला पाण्यात टाकले होते, पण अनेक अडचणी असतानाही आम्ही पोहत राहिलो, आम्ही दिल्लीसाठी चांगले काम केले."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

CM Devendra Fadnavis : ज्योती-सावित्री शाळेचे उद्‍घाटन; पुणे ‘झेडपी’ची संकल्पना राज्यभर

SCROLL FOR NEXT