Arvind Kejriwal Arvind kejriwal
देश

केजरीवाल म्हणाले, भाजपला पराभूत करणे हे माझे ध्येय नाही, तर...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भाजपला पराभूत करणे हे माझे ध्येय नाही. चांगले प्रशासन देऊन व्यवस्था बदलणे आहे. देशाला जगात पहिल्या क्रमांकावर पाहणे हे माझे ध्येय आहे. लोकांना आमचा सकारात्मक अजेंडा आवडला. जेव्हाही लोकांना आमचा सकारात्मक अजेंडा मान्य होतो, तेव्हा ते आम्हाला सत्तेवर आणतात, असे आपचे संयोजक आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind kejriwal) म्हणाले.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. २०१४ प्रमाणे २०२४ मध्येही ते पंतप्रधान मोदींना (Narendra Modi) थेट आव्हान देतील का? असे विचारले असता केजरीवाल म्हणाले, प्रत्येक काळ वेगळा असतो. प्रत्येक काळ आणि वेळ वेगळा असतो. माझ्या जीवनाचा उद्देश मोदींना पराभूत करणे नाही आहे. माझा उद्देश देशाला पहिल्या क्रमांकावर नेण्याचा आहे.

आम आदमी पक्ष (आप) हा केवळ एक पक्ष नसून विचारधारा आहे. भारताला जगात प्रथम क्रमांकावर नेण्याचा मार्ग आहे. गेल्या काही वर्षांपासून देश गरीब आणि अशिक्षित ठेवण्यात आला आहे. लोक संतापले आहेत. सर्व पक्षांनी देश लुटला. आता आम्हाला विश्वास आहे की, जर आम्ही पाच वर्षांत दिल्ली ठीक करू शकतो, तर देश देखील ठीक करू शकतो, असेही अरविंद केजरीवाल (Arvind kejriwal) म्हणाले.

निवडणुकीची तयारी तीव्र

दिल्ली पाठोपाठ आम्ही पंजाबमध्ये प्रचंड बहुमताने सरकार स्थापन केले आहे. आता गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीची तयारी पक्षाने तीव्र केली आहे. अशा परिस्थितीत अरविंद केजरीवाल (Arvind kejriwal) यांनी नरेंद्र पीएम मोदींचे नाव घेऊन केंद्र सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे आपचे नेतेही भाजपला (BJP) घाबरत असल्याचे बोलू लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

72-Year-Old Paragliding : आजोबांनी Gen-Z लाही लाजवलं ! वयाच्या ७२व्या वर्षी घेतली आकाशात झेप, २४ हजार फूट उंचीवरून पॅराग्लायडिंग, VIDEO VIRAL

IND vs AFG 3rd T2OI: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच... श्रेयस अय्यरने Playing XI मध्ये केलाय एक बदल; जाणून घ्या संघ

Crime News: धक्कादायक! चार वर्षीय चिमुकलीसोबत ८५ वर्षीय वृद्धाचे अश्लील कृत्य, डोंबिवलीत संतापाची लाट

Latest Marathi News Update : नागपूरच्या अजनी चौकात ‘आशीर्वाद का दीया’ अभियान; दीपोत्सवाला मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती

Kasari Power Protest: गणेशोत्सवात अखंडित विजेसाठी कासारी ग्रामस्थांचे महावितरणला साकडे; पोतराज आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT