Arvind Kejriwal Latest News Arvind Kejriwal Latest News
देश

Fear Of Operation Lotus : केजरीवालांनी बोलावले विशेष अधिवेशन; आमदारांची बैठक

दिल्ली सरकार पाडण्याच्या प्रयत्नावर चर्चा होणार आहे

सकाळ डिजिटल टीम

Arvind Kejriwal Latest News नवी दिल्ली : दिल्लीत सुरू असलेल्या राजकीय गोंधळादरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी राजकीय परिस्थिती, ईडी आणि सीबीआयकडून आप नेत्यांवर टाकलेले छापे आणि भाजपच्या आरोपांबाबत गुरुवारी (ता. २५) सकाळी ११ वाजता आप आमदारांची त्यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली आहे. यावेळी दिल्ली सरकार पाडण्याच्या प्रयत्नावर चर्चा होणार आहे.

दिल्लीत सुरू असलेल्या राजकीय गोंधळादरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी राजकीय परिस्थिती, ईडी आणि सीबीआयकडून आप नेत्यांवर टाकलेले छापे आणि भाजपच्या आरोपांबाबत गुरुवारी (ता. २५) सकाळी ११ वाजता आप आमदारांची त्यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली आहे. यावेळी दिल्ली सरकार पाडण्याच्या प्रयत्नावर चर्चा होणार आहे.

उत्पादन शुल्क धोरणाबाबत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या निवासस्थानावर आणि इतर ठिकाणांवर छापे टाकल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाल्या आहे. पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन दिल्लीच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. मनीष सिसोदिया यांच्यावर भाजपने ‘शिंदे’ करण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न फसला, असे ते म्हणाले.

भाजपने आमच्या आमदारांना धमकावले आहे. आमची २० कोटींची ऑफर स्वीकारा अन्यथा सिसोदिया यांच्याप्रमाणेच सीबीआयच्या खटल्यांना सामोरे जा. भाजप आमच्या २०-२५ आमदारांच्या संपर्कात असल्याचा दावा, संजय सिंह यांनी केला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भाजपला आप फोडून भगवा पक्षात सामील होण्याची ऑफर दिल्याचा आरोप केल्यानंतर दिल्लीचे राजकारण तापले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : मनमाड रेल्वे स्थानकात माथेफिरूचा धुमाकूळ; प्रवाशांवर दगडफेक, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT