BBC IT Survey  esakal
देश

BBC IT Survey : "निडर व निष्पक्षपणे काम करतच राहणार"; तीन दिवसांच्या चौकशीनंतर BBC ची भूमिका

बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई ऑफिसवर होणारं आयकर विभागाचं सर्वेक्षण काल रात्री अखेर पूर्ण झालं. तीन दिवस सलग हे सर्वेक्षण सुरू होतं.

सकाळ डिजिटल टीम

बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई ऑफिसवर होणारं आयकर विभागाचं सर्वेक्षण काल रात्री अखेर पूर्ण झालं. तीन दिवस सलग हे सर्वेक्षण सुरू होतं. या सर्वेक्षणानंतर आता बीबीसीने आपली भूमिका जाहीर केली असून आपण काम करत राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

बीबीसीच्या काही वरिष्ठ संपादकांसह जवळपास १० कर्मचारी दिल्लीतल्या कस्तुरबा गांधी मार्ग इथल्या कार्यालयातून तीन दिवसांनी घरी परतले आहेत. आयकर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बीबीसीच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मोबाईल फोन्स, लॅपटॉप्स आणि कम्प्युटर्समधला सगळा डाटा आपल्याकडे घेतला आहे.

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी टॅक्स, ब्लॅक मनी, बेनामी असेल कीवर्ड वापरून डिव्हाईसेसमधला डाटा सर्च केला आहे. आपली भूमिका मांडताना बीबीसीने म्हटलं आहे की, आयकर विभागाचे अधिकारी आमच्या दिल्ली आणि मुंबईमधल्या ऑफिसेसमधून आता गेले आहेत. आम्ही या अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करू. लवकरात लवकर हे प्रकरण मिटेल अशी आशा आहे.

बीबीसीने पुढे म्हटलं आहे की, "आम्ही सध्या आमच्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहोत. काहींना दीर्घकाळ चौकशीला सामोरं जावं लागलं आहे, तर काही जणांना रात्रभर ऑफिसमध्येच थांबून राहावं लागलं आहे. त्यांचं सगळं ठीक व्हावं यालाच आमचं प्राधान्य आहे. आमचं काम पुन्हा सुरू झालं असून आम्ही पुन्हा भारत आणि जगातल्या प्रेक्षकांच्या सेवेसाठी आलो आहोत."

"बीबीसी ही एक विश्वासार्ह आणि स्वतंत्र माध्यमसंस्था आहे. निष्पक्ष आणि निडरपणे काम करतच राहणाऱ्या सर्व कर्मचारी आणि पत्रकारांच्या सोबत आम्ही आहोत", असंही बीबीसीने म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT