Asaduddin Owaisi on Sharad Pawar esakal
देश

Asaduddin Owaisi : 'ज्यांनी नवाब मलिकांना तुरुंगात टाकलं त्यांनाच..'; भाजपला पाठिंबा दिल्यामुळं ओवैसींचा पवारांवर निशाणा

नागालँडमधील (Nagaland) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं (NCP) भाजप आघाडीला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादीच्या या निर्णयानंतर आता एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी पवारांवर निशाणा साधलाय.

Asaduddin Owaisi on Sharad Pawar: नागालँडमधील (Nagaland) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं (NCP) भाजप आघाडीला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीच या निर्णयाला हिरवा कंदील दाखवला.

राष्ट्रवादीच्या या निर्णयानंतर आता एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी पवारांवर निशाणा साधलाय.

ओवैसी म्हणाले, 'राष्ट्रवादी भाजपच्या (BJP) B टीमप्रमाणं काम करत आहे. हे कोणीही म्हणणार नाही. शरद पवार जर 'शादाब' असते तर सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी त्यांच्या पक्षाला भाजपची बी टीएम म्हटलं असतं.

एवढंच नाही, तर पवारांना धर्मनिरपेक्षांनी अस्पृश्यही म्हटलं असतं. मी कधीही भाजप सरकारला पाठिंबा दिला नाही आणि कधीच देणार नाही, पण राष्ट्रवादीनं भाजपला पाठिंबा देण्याची ही दुसरी वेळ आहे.'

ज्या भाजपनं राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना तुरुंगात टाकलं, त्याच भाजपला राष्ट्रवादी पाठिंबा देत असल्याचं ओवैसी म्हणाले. मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना तुरुंगात टाकणाऱ्यांना राष्ट्रवादी पाठीशी घालत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

नागालँडमध्ये भाजपला राष्ट्रवादीचा पाठिंबा

नागालँडमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील रिओ सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही नागालँडच्या जनतेच्या हितासाठी हा निर्णय घेत असल्याचं सांगत या निर्णयाला पाठिंबा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT