asaduddin owaisi
asaduddin owaisi esakal
देश

Owaisi on Ram Mandir: महात्मा गांधींनी राम मंदिराचा उल्लेख...; ओवैसींनी उपस्थित केले अनेक प्रश्न

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर बाबरी मशिदीच्या पतनाबाबत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी भाष्य केलं आहे. अयोध्येतील राम मंदिराचा महात्मा गांधींनी देखील कधी उल्लेख केला नाही. खूपच नियोजनबद्ध पद्धतीनं मुसलमानांकडून बाबरी मशीद काढून घेण्यात आली, असा आरोपही त्यांनी केला. (Asduddin Owaisi raised many questions on Ram Mandir Mahatma Gandhi even not mention about it)

महात्मा गांधींनी राम मंदिराचा उल्लेख केला नाही

ओवैसी म्हणाले, "महात्मा गांधींनी कधी राम मंदिराबाबत काही म्हटलेलं नाही. अगदी पद्धतशीरपणे मुसलमानांकडून मशीद काढून घेण्यात आली" यापूर्वी ओवैसी यांनी दिल्लीतील सुंदरकांड पठणावरुन आम आदमी पार्टीवर टीका केली होती.

भाजपपेक्षा तुम्ही वेगळे नाहीत, तुमच्यात आणि भाजप-आरएसएसमध्ये कोणताही फरक नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. आम आदमी पार्टी आता भाजप आणि संघाचा अजेंडा चालवत आहे. काही लोक म्हणताहेत की, ते शरयू नदीवर जाणार नाहीत. पण आता दिल्लीत म्हणताहेत की ते सुंदरकांड आणि हुनमान चालीसाचं पठण करतील. त्यांच्यामध्ये आणि भाजप-आरएसएसमध्ये कोणताही फरक नाही. (Marathi Tajya Batmya)

काँग्रेसला धरलं जबाबदार

दरम्यान, ओवैसी यांनी बाबरी मशिदीच्या पतनावर भाष्य करताना यासाठी काँग्रेसला जबाबदार धरलं आहे. त्यांनी म्हटलं की, जेव्हा काँग्रेस नेते जीबी पंत हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी रात्रीच्यावेळी मशिदीत मूर्ती ठेवल्या. त्यावेळी केके नायर अयोध्येचे कलेक्टर होते. त्यांनी मशीद बंद केली आणि तिथं पूजा-अर्चा सुरु केली. (Latest Marathi News)

नायर हे जनसंघाचे पहिले खासदार होते. त्यानंरतर १९८६ मध्ये मुस्लिमांना न सांगताच मशिदीचे टाळे खोलण्यात आले तसेच बुटासिंह यांनी याचं भूमिपूजन केलं. त्यानंतर ६ डिसेंबर १९९२ रोजी भाजप आणि संघ परिवारानं सुप्रीम कोर्टात दावा केल्यानंतरही बाबरी मशीद पाडली गेली.

बाबरीत गेल्या ५०० वर्षापासून पठण केलं जात होतं

बाबरी मशिदीत गेल्या ५०० वर्षांपासून नमाज पठण केलं जात होतं. नियोजनबद्ध पद्धतीनं ही मशीद भारतीय मुस्लिमांकडून ताब्यात घेण्यात आली. विश्व हिंदू परिषदं जेव्हा स्थापन झाली तेव्हा इथं मंदिर अस्तित्वात नव्हतं. त्या ठिकाणी मशीद होती आणि ती कायम राहिलं. जर १९९२ मध्ये मशीद उद्ध्वस्त झाली नसती तर मुसलमानांना आज हे सर्व पहावं लागलं नसतं, असंही ओवैसी यांनी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: मुंबईतील मतदान केंद्रांवर सुविधा नाहीत; आदित्य ठाकरेंनी व्हिडिओद्वारे मांडली समस्या

Navi Mumbai News: 13 वर्षाच्या मुलाने पॉर्न पाहून अल्पवयीन बहिणीला केलं गरोदर, पनवेलमधील धक्कादायक घटना

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: जावेद अख्तर, शबाना आझमींनी मुंबईत केले मतदान

Deepthi Jeevanji : भारत की बेटी सब पर भारी... दीप्तीने जपानमध्ये रचला इतिहास! 400 मीटर T20 शर्यतीत जिंकले 'गोल्ड मेडल'

IPL 2024: ECB ने निर्णय बदलला... हंगाम संपण्यापूर्वीच इंग्लिश खेळाडू परत जाण्याबाबत पंजाब किंग्सच्या कोचचा खुलासा

SCROLL FOR NEXT