death main.jpg 
देश

ड्यूटीवर असलेल्या फौजदाराने सरकारी वाहनातच स्वतःवर झाडली गोळी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली- दिल्ली पोलिसमधील एका सहाय्यक उपनिरीक्षकाने (एएसआय) कामावर असतानाच स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना दिल्लीतील जखीरा उड्डाणपुलाजवळ घडली. तेजपाल असे आत्महत्या केलेल्या एएसआयचे नाव आहे. तेजपाल हे पीसीआर ड्यूटीवर तैनात होते. पीसीआर व्हॅनमध्येच त्यांनी स्वतःच्या छातीवर गोळी झाडली. त्यांना त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांची व्हॅन जखीरा उड्डाणपुलाजवळ उभी होती. 

या घटनेवेळी आणखी एक पोलिस कर्मचारी त्या व्हॅनमध्ये बसलेला होता, असे बोलले जात आहे. इतर पोलिस कर्मचारी पीसीआर व्हॅनपासून लांब उभे होते. गोळीबाराचा आवाज ऐकताच इतर पोलिसांनी त्वरीत पीसीआर व्हॅन गाठली. त्यावेळी सर्वांना तेजपाल हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. 

सहकाऱ्यांनी त्यांना त्वरीत रुग्णालयात नेले. परंतु, तेजपाल यांना वाचवण्यात त्यांना यश आले नाही. दरम्यान, या घटनेचा सर्व अंगाने तपास केला जाईल, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

55 वर्षीय तेजपाल आपल्या कुटुंबीयांसह गाझियाबादमध्ये राहत असत. तेजपाल हे 1986 मध्ये दिल्ली पोलिसांत दाखल झाले होते. प्राथमिक तपासानुसार त्यांच्या आत्महत्येमागे कौटुंबिक कारण असल्याचे बोलले जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT