Aishanya Dwivedi protests against the India-Pakistan Asia Cup match, recalling the loss of her husband in the Pahalgam terror attack.
esakal
Aishanya Dwivedi protests against India-Pakistan Asia Cup match: सध्या सुरू असलेल्या आशिया कप २०२५मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या क्रिकेट सामन्यावरून देशातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. हा सामना होवू नये, अशी सर्वसामान्यांची इच्छा आहे, तसेच विरोधकांनीही यावरून सरकारवर टीका सुरू केली आहे.
शिवाय बीसीसीआय़वरही ताशेरे ओढले जात आहेत. त्यात आता पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभम द्विवेदी यांची पत्नी ऐशन्या यांनी मोठं विधान केलं आहे. शिवाय, शुभम द्विवेदी यांच्या कुटुंबीयांनीही या सामन्यावर नाराजी व्यक्त केली आहे आणि सामन्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.
शुभम द्विवेदीची पत्नी ऐशन्या द्विवेदी यांनी दुःख व्यक्त केले आहे आणि म्हटले आहे की, पाकिस्तानशी सामना खेळणे म्हणजे पहलगाममधील २६ कुटुंबांच्या बलिदानाचा बीसीसीआयसाठी काही अर्थ नाही. तसेच, त्यांनी देशवासीयांना या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.
ऐशन्या यांनी म्हटले आहे की, पहलगाम हल्ल्याला फक्त पाच महिने झाले आहेत, सरकार आणि बीसीसीआय हा दहशतवादी हल्ला कसा विसरले?. आपल्या देशातील लोक हे कसे करू शकतात? बीसीसीआयसाठी, त्या कुटुंबातील सदस्यांच्या बलिदानास, ऑपरेशन सिंदूरला अजिबात महत्त्व नाही.