देश

आसाम-मिझोराम सीमावादाचे ‘ट्विटवॉर’; मुख्यमंत्र्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : आसाम आणि मिझोराम यांच्यात सुरु असलेल्या सीमावादात आज दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये सुरु असलेल्या ‘ट्विटवॉर’चीही भर पडली. दोघांनीही हिंसाचाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करत एकमेकांना सवाल केले आणि वाद सोडविण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे गळ घातली. हिंसाचारामध्ये आसामच्या सहा पोलिसांचा मृत्यू झाल्याची माहितीही आसामच्या मुख्यमंत्र्यांनी दिली. शहा यांनी दोघांशीही दूरध्वनीवरून चर्चा केल्यानंतर हा वाद मिटण्याची चिन्हे दिसत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आसाम आणि मिझोराममध्ये गेल्या दशकभरापासून सीमावाद सुरु आहे. दोन आठवड्यांपूर्वी मिझोरामच्या नागरिकांनी आसामच्या तीन जिल्ह्यांमध्ये काही अंतरापर्यंत घुसखोरी केल्याचे उघड झाल्यानंतर हा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला. वाद मिटविण्यासाठी मिझोरामचे मुख्यमंत्री झोरामथंगा आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा हे एकमेकांबरोबर चर्चा करत असतानाच आणि दोन दिवसांपूर्वी अमित शहा यांनी मिझोराम दौऱ्यादरम्यान ईशान्य भारतातील मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेतली असतानाच, आज दोन्ही मुख्यमंत्र्यांमध्ये ट्विटरवरून शाब्दिक युद्ध रंगले. दोघांनीही आपल्या राज्यांमधील नागरिकांवर अत्याचार होत असल्याचा दावा करणारे व्हिडिओ प्रसिद्ध केले. मात्र, नंतर अमित शहा यांनी दोघांशीही दूरध्वनीवरून चर्चा केली आणि वादग्रस्त भागांतून पोलिस दल मागे घेण्यास त्यांना सांगितले. शहा यांनी परिस्थितीचा आढावाही घेत सीमेवर शांतता राखण्यास दोन्ही मुख्यमंत्र्यांना सांगितले. सीमेवर शांतता राखण्याचे आश्‍वासन देतानाच सरमा यांनी, हिंसाचारात आसाम पोलिस दलातील सहा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगत त्यांना आदरांजली वाहिली.

सवाल-जवाब

झोरमथंगा : (लाठ्या घेऊन मारहाण करणाऱ्या जमावाला पोलिस थांबविण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर). अमित शहा यांनी हस्तक्षेप करावा.

आसाम पोलिस : मिझोराममधील समाजकंटक आसामच्या सरकारी अधिकाऱ्यांवर दगडफेक करत आहेत

सरमा : मिझोरामच्या पोलिस अधिकाऱ्यांनी आसामच्या अधिकाऱ्यांना निघून जायला सांगितले. असे केले नाही तर दगडफेक सुरुच राहिल, असाही इशारा दिला. (व्हिडिओ शेअर केला) या परिस्थितीत सरकार कसे चालविणार? अमित शहा आणि पीएमओ यांनी हस्तक्षेप करावा.

झोरमथंगा : शहा यांच्याबरोबर बैठक होऊनही आसाम पोलिसांनी मिझोराममध्ये घुसत निष्पाप नागरिकांवर लाठीचार्ज केला. एका जोडप्यालाही धक्काबुक्की केली. या हिंसाचाराचे कसे समर्थन कराल?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata News: चंद्रशेखरन यांचा U-Turn? पुन्हा Tata चेअरमनपदी निवड! निर्णय होताच शेअर्स 5% वाढले; नेमकं काय घडलं?

UPI MDR 2026 : अमेरिकेच्या दबावामुळे युपीआय वर एमडीआर? केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण; जाणून घ्या नेमकं प्रकरण

Asian Games 2026 Cricket : पाकिस्तानला दुबळ्या थायलंडने रडवले, शेजारी २ चेंडू राखून कसेबसे जिंकले; चीन न खेळताच स्पर्धेबाहेर

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या टीमवर दुःखाचा डोंगर; लेखकाचं अकस्मात निधन, सचिन गोस्वामींची भावुक श्रद्धांजली

Latest Marathi News Update : आम्ही ECI च्या विवेकाधिकाराची जागा घेऊ शकत नाही - सुप्रीम कोर्टाचं महत्वाचं निरीक्षण

SCROLL FOR NEXT