Priyanka Gandhi, Rahul Gandhi Team eSakal
देश

UP निवडणुकांसाठी काँग्रेसचा चेहरा कोण? प्रियंका गांधींनी दिलं उत्तर...

प्रियंका गांधींनी दिलेल्या उत्तराने राजकीय वर्तूळात चर्चांना उधाण

सुधीर काकडे

उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्यापार्श्वभूमिवर (Assembly Elections 2022) राजकारण तापलं आहे. उत्तरप्रदेशमध्ये काँग्रेसचा (Congress) मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असेल, यावरून वेगवेगळे राजकीय अंदाज वर्तवले जात होते. त्यातच आता उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार कोण याबद्दल प्रियंका गांधींनी उत्तर दिलं आहे. युवा जाहीरनामा प्रसिद्ध करताना पत्रकारांनी प्रियंका गांधींना (Priyanka Gandhi) राज्यात मुख्यमंत्री पदाच्या चेहरा कोण? मुख्यमंत्री पदाचा कुणी चेहरा दिसतो आहे का? असा प्रश्न विचारला असता, प्रियांका गांधी म्हणाल्या की, आता माझा चेहरा दिसत नाही का? असं म्हणत सुचक इशारा दिला आहे.

काँग्रेसने राज्यात उमेदवारांची निवड करताना महिलांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या पक्षाच्या प्रभारी प्रियंका गांधी यांनी काही महिन्यांपूर्वी 'लडकी हूं, लड सक्ति हूं' मोहिमेची सुरुवात केली. या मोहिमे अंतर्गत विधानसभा निवडणुकीत 40 टक्के तिकिटं महिलांना दिली जातील, अशी घोषणा केली होती. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने गुरुवारी आणखी 41 उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये 16 महिला उमेदवारांचा समावेश आहे. पक्षाने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत पहिल्या यादीप्रमाणेच महिलांचा वाटा ४० टक्के आहे. यापूर्वी 13 जानेवारी रोजी पक्षाने 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यामध्ये सुद्धा 50 महिलांना तिकीटं देण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT