Priyanka Gandhi esakal
देश

Atiq Ahmad Murder : अतिक-अशरफच्या हत्येनंतर प्रियंका गांधींचा भाजपवर निशाणा; म्हणाल्या, जो कोणी असं..

गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांची प्रयागराज या ठिकाणी गोळी घालून हत्या करण्यात आली.

सकाळ डिजिटल टीम

कोणत्याही राजकीय हेतूनं कायदा आणि न्यायालयीन प्रक्रियेशी खेळणं किंवा त्यांचं उल्लंघन करणं आपल्या लोकशाहीसाठी योग्य नाही.

Atiq Ahmad Murder : गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांची प्रयागराज या ठिकाणी गोळी घालून हत्या करण्यात आली. वैद्यकीय चाचणीसाठी नेताना त्यांची हत्या झाली.

प्रयागराज या ठिकाणी त्यांची हत्या झाली आहे. अतिक अहमदवर उत्तर प्रदेशमध्ये अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. या हत्येनंतर राजकीय वर्तूळातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.

सर्व विरोधी पक्षांनी योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारवर निशाणा साधलाय. काँग्रेस (Congress) सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी ट्विट करत म्हटलंय की, 'आपल्या देशाचा कायदा संविधानात लिहिलेला आहे, हा कायदा सर्वोच्च आहे. गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे; पण ती देशाच्या कायद्यानुसारच व्हायला हवी.'

कोणत्याही राजकीय हेतूनं कायदा आणि न्यायालयीन प्रक्रियेशी खेळणं किंवा त्यांचं उल्लंघन करणं आपल्या लोकशाहीसाठी योग्य नाही. जो कोणी असे करतो किंवा असे करणाऱ्यांना संरक्षण देतो, त्यालाही जबाबदार धरलं पाहिजे आणि त्याच्यावर कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे, असं प्रियंका गांधींनी म्हटलंय. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटनास बंदी

SCROLL FOR NEXT