Atiq Ahmed Murder turkish Zigana made pistol that killed atiq ashraf made only in turkey  
देश

Zigana Pistol : १८ सेकंद २० गोळ्या… मेड इन टर्कीश पिस्तूलाने झाली अतिक-अश्रफची हत्या

रोहित कणसे

माफिया अतिक अहमद आणि अशरफ यांच्या हत्ये नंतर सर्वत्र याच प्रकरणाची चर्चा सुरू आहे. यादरम्यान आता या प्रकरणी नवा खुलासा झाला आहे. मारेकऱ्यांकडून पोलिसांनी जप्त केलेले पिस्तूल ही तुर्कीमध्ये बनवलेली आहे. या पिस्तुलावर भारतात बंदी आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांचीही याच पिस्तुलाने हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पण अखेर हे पिस्तूल मारेकऱ्यांपर्यंत कसे पोहोचले? आणि पिस्तुलाची खासियत काय आहे? चला जाणून घेऊया.

पोलिसांनी तिन्ही मारेकऱ्यांना अटक केली आहे. त्यांची चौकशी केली जात आहे. अतिक आणि अशरफ यांची हत्या करणाऱ्या हल्लेखोरांची ओळख लवलेश तिवारी, सनी आणि अरुण मौर्य अशी सांगितली जात आहे. तिन्ही दुचाकीस्वार पत्रकारांच्या वेशात आले होते. तिन्ही हल्लेखोर वेगवेगळ्या जिल्ह्यातून आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. तिघेही प्रयागराजमधील एका हॉटेलमध्ये ४८ तासांपासून खोली घेऊन थांबले होते.

पोलिस रेकॉर्डनुसार, लवलेश तिवारी बांदा, अरुण मौर्य हमीरपूर आणि सनी कासगंजचा रहिवासी आहे. तिन्ही आरोपींवर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. शूटर अरुण याच्यावर आधीच खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरा खुनी सनी याच्यावर 15 खटले सुरू आहेत. लवलेशवर यापूर्वीच गुन्हा दाखल आहे.

हे हल्लेखोर ज्या बाइकवरून आले होते त्याबद्दलही खुलासा झाला असून ही UP70M7337 नंबर बाईक सरदार अब्दुल मन्नान खान या नावावर रजिस्टर केलेली आहे. तर हा नंबर हिरो होंडा सीडी १०० एसएस बाइकवर रजिस्टर आहे. तसेच गाडी तीन जुलै १९९८ रोजी कॅशने खरेदी करण्यात आली होती. ही बाइक कोठून आणली याबद्दल तपास सुरू आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या चौकशीत तिघांनीही आपल्याला मोठे माफिया बनायचे असल्याचे सांगितले आहे. त्यामुळेच त्याने ही घटना घडवली. किती दिवस लहान-सहान शुटर बनुन राहाणार असेही त्यांनी सांगितलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सनी सिंग यापूर्वी तुरुंगात गेला असून तुरुंगातच तो भाटी टोळीचा प्रमुख सुंदर भाटीचा खास बनला. त्याच्यावर सुंदर भाटीसाठी काम केल्याचा आरोपही आहे.

आरोपींकडे हे पिस्तूल कुठून आले?

अतिक आणि अशरफ यांच्या हत्येत जिगाना बनावटीचे पिस्तूल वापरण्यात आले आहे. तुर्कीमध्ये बनवलेले हे पिस्तूल पाच ते सहा लाख रुपयांना मिळते. भारतात यावर बंदी आहे, त्यामुळे इतर देशांतून बेकायदेशीरपणे भारतात आणले जाते. या पिस्तुलमध्ये एकावेळी १७ गोळ्या भरता येतात. एकाच वेळी अनेक गोळ्या झाडल्याचे अतिक अहमदच्या हत्याप्रकरणात दिसून आले. सिद्धू मुसेवालाच्या हत्येमध्ये वापरले होते हेही त्याच मॉडेलचे पिस्तूल असल्याचे बोलले जात आहे.

काय आहे या पिस्तुलाची खासियत?

तुर्कीमध्ये बनवलेले जिगाना मेड पिस्तूल मलेशियाचे लष्कर, अझरबैजान आर्मी, फिलिपाइन्स आर्मी देखील वापरतात. तसेच हे पिस्तूल पूर्णपणे ऑटोमॅटीक असून एकाच वेळी अनेक राऊंड फायर करता येतात.

पाकिस्तानमार्गे भारतात बेकायदेशीरपणे त्याचा पुरवठा केला जातो. ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तानातून भारताला त्याचा पुरवठा केला जातो, असे सांगितले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganesh Visarjan 2025 : लालबागच्या राजासह मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी सज्ज; सकाळपासूनच सुरू होणार मिरवणुका!

GST Reduction: आनंदाची बातमी! जीएसटी कपातमुळे शैक्षणिक खर्च कमी; स्टेशनरी आणि पुस्तकांसह इतर वस्तू होणार स्वस्त

Ganpati Visarjan 2025 Live Updates : पुण्यात सकाळी ९ वाजता गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Ganesh Visarjan 2025: गणेश विसर्जनाच्या दिवशी नैवेद्यात बनवा 'हे' चविष्ट हलवा, बाप्पा प्रसन्न होतील

Asian Hockey Cup 2025 : भारतीय महिलांचा दणदणीत विजय; थायलंडचा ११-० ने धुव्वा

SCROLL FOR NEXT