UP ATS Chief Rajesh Sahni Suicide with their own revolver
UP ATS Chief Rajesh Sahni Suicide with their own revolver 
देश

उत्तरप्रदेश 'एटीएस'चे राजेश साहनी यांची गोळी झाडून आत्महत्या

वृत्तसंस्था

लखनौ : उत्तरप्रदेशमधील दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) मुख्यालयात कार्यरत असलेले पोलिस उपअधीक्षक राजेश साहनी यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. साहनी हे आज (मंगळवार) दुपारी मुख्यालयातील त्यांच्या कार्यालयात मृतावस्थेत आढळले. या धक्कादायक घटनेमुळे उत्तरप्रदेश पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. 

राजेश साहनी हे आयपीएसच्या १९९२ च्या बॅचचे अधिकारी होते. त्यांना २०१३ मध्ये पोलिस अधीक्षकपदी बढती मिळाली होती. ते मूळचे बिहारमधील पाटणा येथील रहिवाशी होते. साहनी यांनी एटीएसच्या अधीक्षकपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर अनेक दहशतवादी कारवायांविरोधात मोहीम यशस्वी केल्या. त्यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलिस अधिकारी आनंदकुमार यांनी सांगितले, की राजेश साहनी यांनी सर्व्हिस रिव्हॉलव्हरमधून स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. मात्र, त्यांनी असे का केले याची माहिती अद्याप समजू शकली नाही. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईत माजी एटीएसप्रमुख हिमांशू रॉय यांनी अशाचप्रकारे गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यामुळे साहनी यांच्या आत्महत्येवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT