Rahul Gandhi said, BJP should stop playing with the pride of the army
Rahul Gandhi said, BJP should stop playing with the pride of the army Rahul Gandhi said, BJP should stop playing with the pride of the army
देश

राहुल गांधींचा हल्लाबोल; भाजपने लष्कराच्या अभिमानाशी खेळणे थांबवावे

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी यांची सलग तिसऱ्या दिवशी चौकशी सुरू आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ईडी कार्यालयातून बाहेर पडताच मोदी सरकारवर हल्लाबोल केला. भाजप सरकार लष्कराचा अभिमान, परंपरा, शौर्य आणि शिस्तीशी तडजोड करीत आहे, असे केंद्र सरकारच्या (Centre Government) अग्निपथ योजनेबाबत ते म्हणाले. (Rahul Gandhi said, BJP should stop playing with the pride of the army)

भारताला दोन आघाड्यांवर आव्हान असताना अग्निपथ योजना सशस्त्र दलांची कार्यक्षमता कमी करू शकते. भाजप सरकारने लष्कराचा अभिमान आणि परंपरेशी खेळणे थांबवावे, असे एका ट्विटमध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले. मंगळवारी केंद्र सरकारने लष्करात अग्निपथ योजना सुरू केली आहे. एकीकडे केंद्र सरकारच्या मंत्र्यांपासून लष्करप्रमुखांपर्यंत या योजनेचे कौतुक होत आहे तर दुसरीकडे विरोधक प्रश्न उपस्थित करीत आहेत.

या योजनेच्या विरोधात अनेक ठिकाणी आंदोलनेही होत आहेत. योजनेंतर्गत दरवर्षी ४० ते ५० हजार तरुणांना सैन्यात भरती करण्यात येणार आहे. ही भरती मेरिट आणि मेडिकलच्या आधारे होणार आहे. यामध्ये ३० ते ४० हजार पगारासह इतर सवलती देण्यात येणार आहेत. ही भरती फक्त चार वर्षांसाठी असेल आणि त्यानंतर अग्निवीरांची सेवा समाप्त केली जाईल. तसेच २५ टक्के अग्निवीरांना कायम केले जाईल.

प्रियांका गांधींही बरसल्या

भाजप (BJP) सरकार सैन्य भरतीला (Indian army) आपली प्रयोगशाळा का बनवत आहे? सैनिकांच्या लांबलचक नोकऱ्या सरकारला बोजा वाटत आहेत? माजी सैनिकही याला असहमत आहेत. लष्कर भरतीशी संबंधित संवेदनशील विषयावर कोणतीही चर्चा, गंभीर विचार नाही. फक्त मनमानी सुरू आहे, असे म्हणत प्रियांका गांधी यांनीही योजनेबाबत सरकारवर प्रश्न उपस्थित केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT