Ayodhya-KarSevak Sakal
देश

Ayodhya Verdict : कार सेवा म्हणजे काय? कोठून आला शब्द?

शब्दाचा इतिहास आणि कारसेवकांची यात्रा... Where did the word come from?

सकाळ डिजिटल टीम

पुणे : सध्या कारसेवा हा शब्द कोणाला फारसा परिचित नाही. पण, 1992मध्ये बाबरी मशीद पाडणाऱ्यांना कारसेवक म्हटले होते. आता ही कारसेवा म्हणजे काय? कोण होते हे कारसेवक? कोणी केली ही कारसेवा? का केली कारसेवा? असे अनेक प्रश्न आज उपस्थित होत आहेत.

कारसेवा म्हणजे काय? 

मुळात कारसेवा हा शब्द मराठी किंवा हिंदी नाही. हा शब्द मूळ संस्कृत भाषेतून आला आहे. (What is Karseva?) कार हा शब्द कर म्हणजेच हात या अर्थाने आहे आणि सेवा किंवा सेवक हे शब्द त्याला जोडून आले आहेत. निस्वार्थपणे सेवा करणारा म्हणजे कारसेवक, असा त्याचा अर्थ आहे. इंग्रजीत हा शब्द Volunteer असा आहे. 

कधी वापरला शब्द? 

कारसेवा या शब्दाचा उल्लेख शीख धर्मगुरुंनी अनेक ग्रंथांमध्ये केला आहे. ही शीख धर्माची शिकवण असल्याचंही सांगितलं जातं. अमृतसरमधील सुवर्ण मंदिराची उभारणी कारसेवेतूनच झाली होती. राम मंदिर आंदोलनाच्या वेळी देशभरातून कारसेवकांची लाटच उसळली होती. लाखो तरुण त्यावेळी अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी त्या दिशेने निघाले होते.

रेल्वे, बस, गाड्या मिळेल त्या वाहनाने कारसेवक राम मंदिराच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी पोलिस आणि सुरक्षा दलांनी उत्तर भारताच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे अडवल्या होत्या. त्यामुळे कारसेवक रेल्वेतून उतरून अयोध्येच्या दिशेने चालत निघाले होते. बाबरी मशीद पाडण्याच्या दिवशी आणि त्यानंतरही लाखो कारसेवक अयोध्या आणि परिसरात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction: कॅमेरॉन ग्रीनसाठी ऐतिहासिक बोली! KKR अन् CSK मध्ये जोरदार रस्सीखेच; बनला सर्वात महागडा परदेशी खेळाडू

Hasan Mushrif : ‘आम्ही केलं; आता जबाबदारी तुमची’ शेंडा पार्क वैद्यकीय नगरीत मंत्री हसन मुश्रीफ यांचा ठाम संदेश

Virat-Anushka Meet Premanand Maharaj : प्रेमानंद महाराज यांनी विराट-अनुष्काला सांगितला रावणाच्या मृत्यूनंतरचा 'तो' प्रसंग, नेमकं काय म्हणाले? वाचा...

Mumbai News: गोराईत रडार, दहिसरमध्ये विकास; राज्य सरकारचा मोठा निर्णय, गृहनिर्माण प्रकल्पांना गती

IPL 2026 Auction : गडी पेटला... सर्फराज खानने २२ चेंडूंत चोपल्या ७३ धावा, ३३१.८२ चा स्ट्राईक रेट; सेलिब्रेशन तर भन्नाटच Video Viral

SCROLL FOR NEXT