M. Balamuralikrishna
M. Balamuralikrishna 
देश

ज्येष्ठ कर्नाटकी गायक बालमुरलीकृष्ण यांचे निधन

यूएनआय

चेन्नई - कर्नाटकी संगीतातील ज्येष्ठ गायक मंगलपल्ली बालमुरलीकृष्ण (वय 86) यांचे मंगळवारी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

शास्त्रीय गायक, पार्श्‍वगायक, संगीतकार, अभिनेते, विविध वाद्यांचे वादक या रूपातून बालमुरलीकृष्ण यांनी संगीत क्षेत्रात आपले आगळे स्थान निर्माण केले. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी रंगमंचावर प्रथम गायनास सुरवात केली. त्यानंतर देशात व परदेशात पंचवीस हजारांहून अधिक कार्यक्रम त्यांनी सादर केले. बालमुरलीकृष्ण यांनी 72 मेलाकर्था रागांवर प्रभुत्व मिळविले होते. त्यावर आधारित अनेक कृतींची त्यांनी निर्मिती केली.

आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील संकरागपट्टम येथे त्यांचा जन्म झाला. वयाच्या सहाव्या वर्षीपासूनच त्यांनी गायनास प्रारंभ केला. तेलुगू ही त्यांची मातृभाषा होती. मात्र, ते तेलुगूसह कन्नड, संस्कृत, तमीळ आणि अन्य भाषांमध्ये अस्खलीतपणे गायन करीत असत. विविध भाषांत त्यांनी विविध रागांवर आधारित 400 हून अधिक रचना केल्या. त्यांचे वडीलही गायक होते, तर आई वीणावादन करीत असे. रामकृष्ण पंतुलू यांच्याकडे बालमुरलीकृष्ण यांनी संगीताचे प्राथमिक धडे गिरवले. आठव्या वर्षीच त्यांनी विजयवाडा येथे पहिला गायनाचा कार्यक्रम सादर केला. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी सर्व 72 मेलाकर्था रागांवर प्रभुत्व मिळविले होते. पुढे त्यांनी गायनाप्रमाणेच मृदंग, खंजीरा, व्हायोलिन ही वाद्ये वाजविण्यास प्रारंभ केला. स्वरभास्कर भीमसेन जोशी यांच्यासमवेत त्यांनी अनेक कार्यक्रम केले. त्याचप्रमाणे पंडित हरिप्रसाद चौरसिया, किशोरी अमोणकर यांच्यासमवेत जुगलबंदीचे कार्यक्रम सादर केले.

भारतातील विविध शहरांप्रमाणेच अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, फ्रान्स, रशिया, श्रीलंका, मलेशिया आदी देशांत त्यांनी गायनाचे अनेक कार्यक्रम केले. 1967 मध्ये "भक्त प्रल्हाद' या चित्रपटात सर्वप्रथम नारदाची भूमिका साकारली. नंतर त्यांनी विविध चित्रपटांत भूमिका साकारल्या.

संगीत क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये "पद्मविभूषण', "पद्‌मभूषण', "पद्‌मश्री'चा समावेश आहे. फ्रान्स सरकारने त्यांना "चेव्हलिअर' सन्मान दिला होता. त्यांना पार्श्‍वगायन व पार्श्‍वसंगीतासाठीही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT