डिलीव्हरी बॉयद्वारे दारू, गांजा व्हायचा घरपोहच, NCB कडून भांडाफोड
डिलीव्हरी बॉयद्वारे दारू, गांजा व्हायचा घरपोहच, NCB कडून भांडाफोड sakal
देश

बंगळूरू : डिलीव्हरी बॉयद्वारे दारू, गांजा व्हायचा घरपोहच, NCB कडून भांडाफोड

सकाळ डिजिटल टीम

बंगळूरू : स्विगी या ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मद्वारे घरपोहच दारू आणि गांजा पोहचवणाऱ्या टोळीतील सात जणांना अटक केल्याचा दावा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने केला आहे. एनसीबीच्या बेंगळुरू झोनल युनिटच्या विशिष्ट माहितीनुसार कारवाई करून 30 सप्टेंबर रोजी दोन लोकांना अडवले असता दोघे कुरियर वाहनातून आठ बॉक्सची दारू मारुती कारमध्ये चढवण्याच्या कामात होते. तपासणी दरम्यान बॉक्समधे उच्च दर्जाचा गांजा, चिकट टेपने कागदाच्या आत गुंडाळलेल्या स्वरूपात आढळला. 137 किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आल्याचे एनसीबीच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

या कारवईमध्ये तब्बल 4.81 लाखांची रोकड आणि पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे सामान जप्त करण्यात आले. तसेच गांजाचे पार्सल घरोघरी पोहोच करणारा स्विगी डिलीव्हरी बॉयला पकडण्यात आले आहे. यानंतरच्या कारवाईमध्ये अन्य आरोपीच्या निवासी परिसरातून सुमारे 3 किलो गांजा आणि 39,000 रुपये जप्त करण्यात आले आहेत.

औषध अंमलबजावणी एजन्सीच्या म्हणण्यानुसार, हे आरोपी माल डिलीव्हरी बॉय किंवा कुरिअर्स द्वारे पोहोच करायचे. आरोपी त्यांच्या ग्राहकांना माल पोलीस अडवू नयेत म्हणून स्विगी डिलीव्हरी बॉयच्या वेशात देत होते. या रॅकेटमध्ये अनेक डिलीव्हरी बॉईज सामील असल्याचे तपासातून समोर आले आहे. ग्राहकांना घरपोहच माल देण्याचे आश्वासन ते देत होते असे एनसीबीच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT