अब्दुल करीम तेलगी 
देश

बनावट मुद्रांक घोटाळ्यातील आरोपी अब्दुल करीम तेलगीचा मृत्यू

वृत्तसंस्था

बंगळूरः कोट्यवधींच्या मुद्रांक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी अब्दुल करीम तेलगी (वय 56) याचा आज (गुरुवार) मृत्यू झाला. तेलगी सध्या बंगळुरूमधील केंद्रीय कारागृहात शिक्षा भोगत होता. गैरव्यवहार प्रकरणी त्याला 30 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झालेली आहे. बनावट मुद्रांक गैरव्यवहार प्रकरणी 1992 ते 2002 या काळात तेलगीवर महाराष्ट्रात बारा आणि देशाच्या इतर भागात पंधरा खटले दाखल झाले होते. त्याच्या गैरव्यवहाराची व्याप्ती तब्बल बारा राज्यांमध्ये पसरली होती.

बंगळूरमधील व्हिक्टोरिया रुग्णालयात तेलगीवर उपचार सुरु होते. गेल्या काही दिवसांपासून तेलगीची प्रकृती गंभीर होती. त्यामुळेच त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. वीस वर्षांपासून त्याला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. शरीरातील विविध अवयवांनी (मल्टिपल ऑर्गन फेल्युअर) काम थांबवल्याने तेलगीचा मृत्यू झाला.

तेलगीला बनावट मुद्रांक घोटाळा प्रकरणात २००१ मध्ये अजमेरमधून अटक करण्यात आली होती. रुग्णालयात दाखल करण्याआधी त्याला बंगळुरुतील तुरुंगात ठेवण्यात आले होते. बनावट मुद्रांक घोटाळ्यातून तेलगीने कोट्यवधींची कमाई केली होती. तेलगीने बनावट ‘स्टॅम्प पेपर’ छापून ते विविध बँका, विमा कंपन्या आणि शेअर ब्रोकिंग कंपन्यांना विकले होते. तेलगीच्या या प्रचंड मोठ्या प्रमाणात घोटाळ्यात अनेक नेत्यांचा सहभाग असल्याचीही चर्चा झाली होती. या प्रकरणात तेलगीला ३० वर्षांची शिक्षा झाली होती. याशिवाय तेलगीला तब्बल २०२ कोटींचा दंडदेखील ठोठावण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विद्यार्थ्यांचा निर्लज्जपणे राजकारणासाठी वापर, धर्मेंद्र प्रधान यांची राहुल गांधींच्या आंदोलनावर टीका

Delhi Police DCP Sandeep Lamba : पोलिसांनी मुलींवर कानाखाली मारणे कायद्यात बसतं का?, डीसीपी संदीप लांबांनी तरूणीला कानाखाली मारल्याचा व्हिडिओ व्हायरल; विरोधकांनी घेरलं

Live Updates Marathi : दिल्लीतील जंतरमंतरवर भर पावसात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच

Pune Rain: धरणसाखळीला पावसाचा जबरदस्त बूस्ट! अवघ्या २४ तासांत १,३८० एमसीएफटी पाण्याची आवक, साठा ७३% वर

Priyanka Gandhi: ‘आंदोलन दडपण्याचा सरकारला अधिकार नाही’; सुटकेनंतर प्रियांका गांधींचा सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT