CIBIL Score
CIBIL Score  
देश

CIBIL Score कमी आहे म्हणून शैक्षणिक कर्ज नाकारता येणार नाही; हायकोर्टाचे महत्वाचे निर्देश

धनश्री ओतारी

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जासंदर्भात हायकोर्टाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. फक्त सिबिल स्कोअर कमी असल्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याने शैक्षणिक कर्जासाठी केलेला अर्ज बँक नाकारू शकत नाही, असे केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे. (banks should not deny them education loans over low CIBIL score: Kerala High Court)

आजचे विद्यार्थी हे उद्याचे राष्ट्रनिर्माते आहेत. त्यांना भविष्यात या देशाचे नेतृत्व करायचे आहे. फक्त सिबिल स्कोअर कमी असल्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याने शैक्षणिक कर्जासाठी केलेला अर्ज बँक नाकारू शकत नाही, असे महत्वाचे निर्देश केरळ उच्च न्यायालयाने मंगळवारी एका प्रकरणात दिले.(Latest Marathi News)

न्यायमूर्ती पी.व्ही. कुन्हीकृष्णन यांनी एका प्रकरणाची सुनावणी घेताना हे महत्वाचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज देण्यासाठी बँकांनी मानवतावादी दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे, असंही न्यायमूर्ती पी.व्ही. कुन्हीकृष्णन यांनी म्हटलं आहे.(Latest Marathi News)

याचिकाकर्त्या विद्यार्थ्याने शिक्षण पूर्ण करण्यासाठी बँकेकडे कर्जासाठी अर्ज केला होता. मात्र, आधी घेतलेल्या शैक्षणिक कर्जाचा 16,667 रुपयांचा हप्ता थकीत असल्याने बँकेने त्याला तुमचा सिबिल स्कोअर कमी आहे, असं म्हणत कर्ज देण्यास नकार दिला.(Latest Marathi News)

याविरोधात विद्यार्थ्याने कोर्टात धाव घेतली. विद्यार्थ्याला शैक्षणिक कर्ज नाही मिळाले तर त्याचे मोठे नुकसान होईल, असं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. सिबिल स्कोअर कमी असल्यामुळे हे शैक्षणिक कर्ज नाकारण्याचे कारण असू शकत नाही, कारण कर्जाची परतफेड विद्यार्थ्याने शिक्षण पूर्ण केल्यानंतर केली जाते, असंही याचिकाकर्त्याच्या वकिलांनी कोर्टासमोर सांगितलं.(Latest Marathi News)

याचिकाकर्त्याला एका कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळाली आहे. या नोकरीच्या आधारावर तो घेतलेल्या कर्जाच्या रक्कमेची पुढे परतफेड करेल, असा विश्वासही याचिकाकर्त्याच्या वकिलांनी कोर्टाला दिला. (Latest Marathi News)

दरम्यान, दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने बँकेला विद्यार्थ्याला शैक्षणिक कर्ज देण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर या कर्जाची रक्कमेची वेळवर परतफेड करा, असंही कोर्टाने यावेळी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

Australia Squad T20 WC 24 : ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा! ODI वर्ल्डकप जिंकवणाऱ्या पॅट कमिन्सऐवजी 'या' खेळाडूकडे कर्णधारपदाची माळ

'..तर तुम्हाला महाराष्ट्रात येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही'; मनोज जरांगे-पाटलांचा थेट कर्नाटक सरकारला इशारा

Manipur : मणिपूरमधील 'त्या' महिलांना पोलिसांनीच केलं जमावाच्या स्वाधीन; CBI चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT