barak and rahul. 
देश

राहुल गांधींवरील वक्तव्यावरुन नेटकऱ्यांमध्ये संताप; '#माफ़ी_माँग_ओबामा' हॅशटॅग ट्रेण्ड

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या ‘ए प्रॉमिस लँड’ या नव्या पुस्तकात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे वर्णन गोंधळलेले नेते असा केलाय. ओबामा यांनी त्यांच्‍या आत्मवृत्तात राहुल गांधी यांच्यासंदर्भात केलेल्या उल्लेखाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. ओबामा यांनी राहुल यांच्याबद्दल असे शब्द कसे वापरले, असा प्रश्न भारतीय नेटकऱ्यांनी विचारला आहे. याचसंदर्भात आक्षेप नोंदवताना ओबामा यांनी माफी मागावी अशी मागणी काही जणांनी केली आहे.  याबाबत #माफ़ी_माँग_ओबामा हा हॅशटॅग ट्विटरवर टॉप ट्रेण्ड होता.

ओबामा यांनी लिहिले आहे की, राहुल हे एखाद्या घाबरलेल्या विद्यार्थ्यासारखे वाटतात. ज्याने अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि आपल्या शिक्षकांना प्रभावीत करण्यासाठी उत्सुक आहे, पण फारशी चमक नसलेला आणि त्या नाही आणि त्या विषयातही प्रावीण्य मिळविण्याची गुणवत्ता विद्यार्थ्यात नाही, असे राहुल आहेत. ‘ए प्रॉमिसिड लँड’ या ओबामा यांच्या आत्मचरित्राच्या पहिल्या भागातील हा उल्लेख ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने प्रसिद्ध केलेल्या लेखात केला आहे. ओबामा यांनी त्यांच्या आत्मचरित्रात अमेरिकेचेसह जगभरातील राजकीय नेत्यांवर भाष्य केले आहे. यात राहुल गांधी यांच्यासह माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांचाही समावेश आहे.

ओबामा यांच्या कार्यकाळात राहुल गांधी हे काँग्रेसचे उपाध्यक्ष होते. डिसेंबर २०१७ मध्ये ते भारताच्या भेटीवर आले असता राहुल यांना भेटले होते. त्या वेळी राहुल गांधी यांनी या भेटीबद्दल ट्विट करीत अध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी फलदायी चर्चा झाली. त्यांना पुन्हा भेटायला आवडेल, असे म्हटले होते. त्यांनी ओबामा यांच्याबरोबर काढलेले छायाचित्रही पोस्ट केले होते.

मनमोहनसिंग यांचे कौतुक

ओबामा यांच्या अध्यक्षपदाच्या २००९-२०१७ या काळात भारतात काही काळ मनमोहन सिंग यांचे सरकार सत्तेवर होते. ओबामा यांनी त्यांच्या पुस्तकात मनमोहनसिंग यांचे कौतुक केले आहे. त्यांच्यामध्ये एक प्रकारची गाढ निष्ठा आहे. अमेरिकेचे तत्कालीन संरक्षण मंत्री बॉब गेट्स यांच्याबाबतही त्यांनी कौतुकोद्‍गार काढले आहेत.

‘न्यूयॉर्क टाईम्स’मधील वृत्तानुसार ओबामा यांनी व्लादिमिर पुतीन यांचे वर्णन मजबूत व्यक्तिमत्त्व आणि कोणत्याही कठीण काळात योग्य दिशा नेतृत्व असे केले आहे. ‘शारीरिकदृष्ट्या ते अतुलनीय आहे, त्यांनी म्हटले आहे.

ज्यो बायडेन सभ्य माणूस

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळविलेले डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन हे सभ्य माणूस असल्याचे ओबामांनी म्हटले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: काव्या मारनच्या संघात ३००+ विकेट्स घेणारा खेळाडू दाखल; KKRनेही विदर्भच्या पोट्ट्यासाठी मोजले लाखो

ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा ठाणेकरांना दिलासा! १०० कोटींची देणी थकीत, अनेक महत्त्वाच्या गोष्टींची तरतूद; वाचा सविस्तर

Latest Marathi News Live Update : इगतपुरी तालुक्यात पुन्हा अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची घटना

प्रीपेड वीजबिल वसुलीची ‘सरकारी एन्ट्री’! वीजजोडण्या बदलण्यास ऊर्जा विभागाची मंजुरी

Kedarnath Yatra: केदारनाथ यात्रेकरूंना मोठे गिफ्ट! १३ वर्षांनंतर रामबाडा-गरुडचट्टी मार्ग 'रेडी'; आपत्तीच्या काळात ठरणार 'लाईफलाईन'!

SCROLL FOR NEXT