देश

ठरलं! बसवराज बोम्मई कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री

विनायक होगाडे

बेंगलुरु: बसवराज एस बोम्मई यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदी निवड झाली आहे. याबाबतचं वृत्त न्यूज 18 कन्नड या वृत्तवाहिनीने दिलं आहे. बीएस येडियुरप्पा मुख्यमंत्री पदावरुन पायउतार झाल्यानंतर त्यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदी वर्णी लागली आहे. ते कर्नाटकचे 20 वे मुख्यमंत्री ठरले आहेत. बोम्मई हे गृहमंत्री होते. पुढचे मुख्यमंत्री तुम्ही असणार का? या प्रश्नावर त्यांनी नकारात्मक उत्तर दिलं होतं. मात्र, आता त्यांचीच मुख्यमंत्री पदी निवड करण्यात आली आहे.

कर्नाटकमधील राजकीय घडामोडींबाबत बेंगळुरू ते दिल्ली दरम्यान हालचाली गतिमान झाल्या होत्या. येडियुरप्पा यांचा उत्तराधिकारी कोण असेल, याबाबत केंद्रीय शीर्ष नेत्यांनी अद्याप कोणतीही वाच्यता केली नव्हती. मात्र मंगळवार संध्याकाळपर्यंत भाजप बीएस येडियुरप्पा यांचा उत्तराधिकारी कोण हे जाहीर करण्याची शक्यता होती, त्याप्रमाणे बोम्मई यांची निवड करण्यात आली आहे.

बी.एस. येडियुरप्पा यांनी सोमवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. येडियुरप्पा यांच्या सरकारला दोन वर्ष पूर्ण होत असतानाच, त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. रविवारी त्यांनी २६ जुलैला मी माझ्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात निर्णय घेईन, असे स्पष्ट केले होते. "उद्या काय होते ते पाहू. मला हायकमांडकडून अजून निर्देश मिळालेले नाहीत" असे येडियुरप्पा यांनी रविवारी म्हटले होते. भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी येडियुरप्पा चांगले काम करत असल्याबद्दल त्यांचे कौतुकही केले होते. मात्र, त्यांना आपल्या पदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं.

राजीनामा दिल्यानंतर विधानसौधमध्ये बोलताना येडियुरप्पा म्हणाले होते की, मला माझ्या कारकिर्दीमध्ये नेहमीच अग्निपरिक्षा द्यावी लागली आहे. "एकापाठोपाठ एक मी अग्निपरिक्षेचा सामना केलाय, तरी सुद्धा मी माझे काम करत राहिलो. सरकारी कर्मचारी, मुख्य सचिव यांचे आभार कसे मानू, ते मला समजत नाहीय. त्यांनी खूप मेहनत केली. माझ्यावर विश्वास ठेवला. त्यांच्यामुळेच कर्नाटकाचा विकास करता आला" असे येडियुरप्पा म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT