Train Accident esakal
देश

Train Accident : 59 वर्षांआधीची ती थरारक घटना, जेव्हा समुद्रात बुडाली होती ट्रेन अन् स्टेशनही नेस्तनाबूत

या भीषण अपघाताचं चित्र आजही डोळ्यासमोर आठवताच अंगावर शहारे येतात.

साक्षी राऊत

Train Accident : ओडिसा राज्यातील बालासोर या ठिकाणी झालेल्या तीन ट्रेमच्या गंभीर अपघाताने सगळ्यांना हादरवून सोडले आहे. शेकडो लोक या अपघातात मृत्यूमुखी पडलेत. ५९ वर्षाआधीच अशीच एक थरारक घटना घडली होती.

डिसेंबर 1964 मध्ये तामिळनाडूतील पंबन रेल्वे स्थानकावरून ट्रेन क्रमांक-653 धनुषकोडीच्या दिशेने निघाली होती, परंतु मध्येच ही ट्रेन चक्रीवादळाच्या तडाख्यात अडकली आणि समुद्रात बुडाली. या रेल्वे अपघातात 200 जणांचा मृत्यू झाला होता. या भीषण अपघाताचं चित्र आजही डोळ्यासमोर आठवताच अंगावर शहारे येतात.

15 डिसेंबर 1964 चा तो दिवस होता. हवामान खात्याने दक्षिण अंदमानमध्ये जोरदार वादळ निर्माण होणार असल्याचा पूर्वइशारा दिला होता. यानंतर अचानक वातावरणात बदल झाला आणि तुफान वादळासह जोरदार पाऊस सुरू झाला. 21 डिसेंबरपर्यंत हवामानाने भयानक रूप धारण केले. यानंतर 22 डिसेंबर 1964 रोजी श्रीलंकेतून आलेले चक्रीवादळ ताशी 110 किलोमीटर वेगाने भारताकडे सरकले.

Train Accident

यादरम्यान, तामिळनाडूच्या 'पंबन बेटावर' धडकल्यानंतर वादळ ताशी 280 किलोमीटर वेगाने वेस्ट-नॉर्थ-वेस्ट दिशेने सरकू लागले. वादळाचा वेग एवढा जास्त होता की लोकांमध्ये आरडाओरडा झाला. दरम्यान, 22 डिसेंबर 1964 चा तो दिवस उगवला. त्यावेळी संध्याकाळचे साधारण ६ वाजले होते.

तामिळनाडूतील पंबन बेटाचे धनुषकोडी रेल्वे स्टेशन रोजच्याप्रमाणे गजबजले होते. स्टेशन मास्तर आर. सुंदरराज वादळ आणि पावसात आपली ड्युटी संपवून घरी परतले होते.

रात्री 9 च्या सुमारास पंबन ते धनुषकोडीकडे धावणारी 'पॅसेंजर ट्रेन-653' 100 प्रवाशांना घेऊन 'धनुषकोडी रेल्वे स्टेशन'च्या दिशेने निघाली. त्यानंतर 11:55 वाजता, ही ट्रेन धनुषकोडी रेल्वेला पोहोचणार होती, तेवढ्यातच चक्रीवादळाची तीव्रता वाढली.

सिग्नल मिळाले नाही, तरीही लोको पायलटने धोका पत्करला

जोरदार पाऊस आणि वादळामुळे सिग्नलमध्ये बिघाड झाला. यानंतर लोको पायलटने धनुषकोडी स्थानकापासून काही अंतरावर ट्रेन थांबवली. बराच वेळ वाट पाहिल्यानंतरही लोको पायलटला सिग्नल न मिळाल्याने जोखीम पत्करून त्याने वादळाच्या मध्यातून ट्रेन पुढे नेली. (Railway)

या रेल्वे अपघातात जवळपास 200 जणांचा मृत्यू झाला होता

समुद्रावर बांधलेल्या 'पंबन ब्रिज'वरून ट्रेन हळू हळू जात होती. यासोबतच समुद्राच्या लाटाही जोर धरू लागल्या. अचानक लाटा इतक्या जोरात आल्या की 6 डब्यांच्या या ट्रेनमध्ये 100 प्रवासी आणि 5 रेल्वे कर्मचाऱ्यांसह एकूण 105 जण समुद्राच्या खोल पाण्यात बुडाले. (Accident)

ट्रेनमध्ये 200 प्रवासी होते, कारण अनेक जण विना तिकीट प्रवास करत असल्याचं सांगण्यात येत होतं. या रेल्वे अपघातात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. असे म्हटले जाते की हे चक्रीवादळ भारताला धडकणाऱ्या आतापर्यंतच्या सर्वात धोकादायक वादळांपैकी एक होते. (Tamil Nadu)

वादळाच्या विध्वंसक रूपाने स्थानकाचे नाव आणि खुणासुद्धा पुसून टाकल्या होत्या

'धनुषकोडी रेल्वे स्टेशन'चे नाव पुसले गेले यावरून या वादळाच्या विध्वंसाचा अंदाज लावता येतो. या चक्रीवादळामुळे 1,500 ते 2,000 लोकांचा मृत्यू झाला. फक्त धनुषकोडीमध्ये 1000 हून अधिक लोक मारले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी संस्थाचा मोठा निर्णय; मंदिर २४ तास भक्तांसाठी खुलं राहणार!

SCROLL FOR NEXT