देश

बेळगावात गजबजलेल्या चन्नम्मा सर्कलमध्ये बर्निग कारचा थरार

संजय सूर्यवंशी

बेळगाव - चन्नम्मा सर्कल मध्ये आज अचानक ओमनी मोटारीने पेट घेतला. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु मोटार जळून खाक झाली. कोल्हापूर येथील परशुराम जयवंत कागलकर हे त्यांच्या नातेवाईकांना घेऊन बेळगावला एका नातेवाईक रुग्णाला पाहण्यासाठी आले होते.

चन्नम्मा सर्कल मध्ये अचानक मोटार बंद पडली . त्यांनी ती सुरू केली परंतु  पुढे 50 मीटरवर असलेल्या  बस थांब्याजवळ पुन्हा मोटार बंद पडली.  त्यांनी पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला असता पाठीमागील बाजूने अचानक धूर येऊ लागला  व लागलीच मोटारीने पेट घेतल.  

यावेळी मोटारीत असलेले चालकासह सहाजण  तातडीने उतरून बाजूला झाले. त्यानंतर आग चांगलीच भडकली. अग्निशामक दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणण्यात आली. चन्नम्मा सर्कल मध्ये घडलेल्या घटनेमुळे  एकच खळबळ उडाली.  वाहतूक कोंडी झाल्याने येथे सुरू असलेले सिग्नल बंद करून पोलीस  स्वतः वाहतुकीला शिस्त लावत  होते. मोटारीचे मोठे नुकसान झाले आहे खडेबाजार व वाहतूक पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT