देश

फुकटच्या जेवणासाठी स्विगीच्या डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण

नामदेव कुंभार

फूड डिलिव्हरी करणाऱ्या स्विगीच्या एका कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. बेंगळुरुमध्ये स्विगीच्या कर्माचाऱ्याला फुटक जेवण न दिल्यामुळे मारहाण झाल्याचं प्रकरण समोर आलं आले. बेंगळुरुमधील राजाजीनंगरमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण झाली आहे. मारहाण झाल्याच्या कर्मचाऱ्याचं नाव कार्तिक हरिप्रसाद ( 25 वर्ष) असं आहे. 28 मे रोजी येथील चार तरुणानं कार्तिकला बेदम मारहाण करत लुटमार केली. ऑर्डर घेऊन गेल्यानंतर तरुणांनी कार्तिककडे मोफत जेवण देण्यासंदर्भात विचारलं. कार्तिकनं मोफत जेवण देण्यास नकार दिल्यानंतर तरुणांनी त्याला बेदम मारहाण केली. तसेच त्याच्याकडील रोख रक्कम आणि मोबाईलही घेतला. कार्तिकच्या मित्रानं ही घटना सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर उजेडात आीली. त्यानंतर सोशळ मीडियाव लोकांनी शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे.

‘द न्यूज मिनट’ च्या वृत्तानुसार, कार्तिकचा मित्र वसीम यानं आपल्या इन्स्टाग्रामवर 28 मे रोजी घडलेला प्रकार पोस्ट केला. तसेच कार्तिकच्या झालेल्या नुकसानीची मागणी करत लोकांकडे मदतीच्या पैसे देण्यासंदर्भात विनंती केली. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा कार्तिकनं ग्राहकाकडे ऑर्डरसाठीचे पैसे मागितले, तेव्हा पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर 20 वर्ष वय असणाऱ्या चार तरुणांनी कार्तिकला शिवीगाळ केली. कार्तिकनं याचा विरोध करताच चौघांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर त्याच्या डोक्यावर दगडानं मारण्यात आलं. यानंतर कार्तिक बेशुद्ध होऊन पडला.

दुसऱ्या डिलिव्हरी कर्मचाऱ्यानं कार्तिकला बेसुद्ध अवस्थेत रस्त्याच्या कडेला पाहिलं अन् पोलिसांना कळवलं. त्यानंतर कार्तिकला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारानंतर कार्तिक सध्या ठीक आहे. कार्तिकच्या डोक्यावर टाके पडले आहेत. चार तरुणांनी कार्तिकला बेदम मारहाण केली. इतर लोक तिकडे येत असल्याचे पाहून सर्वांनी पळ काढला. रिपोर्ट्सनुसार, मारहाणीदरम्यान कार्तिकच्या दुचाकी आणि फोनलाही नुकसान झालं आहे. आरोपींनी कार्तिकच्या खिशातील 18 हजार रुपये पळवले. कार्तिकनं बहिणीच्या लग्नासाठी ही रक्कम साठवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shraddha Kapoor: अडीचशे कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात श्रद्धा कपूरचा भाऊ अडचणीत; 25 तारखेला हजर राहण्याचे आदेश

Talegaon Election : तळेगाव दाभाडेत नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत; १९ नगरसेवक बिनविरोध, उर्वरित ९ जागांसाठी २३ उमेदवार रिंगणात!

Pune Crime : टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर आंदेकर टोळीतील आरोपींची धिंड

Pune News : महापालिकेतील उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या, अधिकारी धास्तावले

Daund Election : दौंड नगरपालिका निवडणूक तापली; नगराध्यक्षपदासाठी सहा महिला, तर सदस्यपदासाठी तब्बल ८६ उमेदवार रिंगणात!

SCROLL FOR NEXT