Rahul Gandhi 
देश

Bharat Jodo : राहुल गांधी एक पाऊल मागे? जाहीर सभेत सावरकरांवर बोलणं टाळलं

सकाळ डिजिटल टीम

शेगाव - काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी आज भारत जोडो यात्रेदरम्यान शेगाव येथे जाहिर सभेला संबोधित केलं. दोन दिवसापूर्वीच राहुल गांधी यांनी विनायक सावरकर यांच्या माफीनाम्याच्या पत्राबाबत विधान केले होते. त्यावर आजच्या सभेत राहुल गांधी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र राहुल गांधी यांनी यावर भाष्य करणे टाळल्याचं पाहायला मिळालं. (Rahul Gandhi news in Marathi)

राहुल गांधी यांनी यावेळी मोदी सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली. राहुल म्हणाले की, ज्यांनी हिंसा सहन केली, ते कधीही हिंसा करू शकत नाही. तिरस्कारही करू शकत नाही. आपण जनतेच्या मन की बात करण्यासाठी आलो, असं म्हणत राहुल यांनी मोदींना टोला लागला.

हेही वाचा का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

यावेळी राहुल यांनी विदर्भातील शेतकरी आत्महत्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले आमचं सरकार असताना विदर्भातील शेतकरी अडचणीत आले होते. त्यावेळी आम्ही तातडीने पॅकेज दिलं. मात्र आता शेतकऱ्यांना विम्याचा हप्ता भरून देखील नुकसान झाल्यावर भरपाई मिळत नाही.

विदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांचा आवाज ऐकला तर महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या बंद होतील. त्यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी मन मोठं करून शेतकऱ्यांचा आवाज ऐकायला हवा, असंही राहुल यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कुटुंबियांना भेटताच अश्रुंचा बांध फुटला, सुप्रिया सुळेंसह सुनेत्रा पवारांनी हंबरडाच फोडला; काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर

Cricketer Arrest: धक्कादायक भारताच्या माजी क्रिकेटपटूला अटक! दारूच्या नशेत ३ गाड्यांना दिली धडक

वडिलांचे स्वप्न पूर्ण केल पण स्वतःचं तसंच राहिलं; अजितदादांसोबत अपघातात २९ वर्षीय पिंकी मालीचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : अपघातापूर्वी पायलटचा थेट ATC सोबत संवाद, सांगितली महत्वाची माहिती..

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांमुळे बीडकरांचं ४५ वर्षांचं स्वप्न झालं होतं पूर्ण; पालकमंत्रीपद स्वीकारल्यापासून 'हे' बदल केले

SCROLL FOR NEXT