Congress Bharat Jodo Yatra esakal
देश

Congress : भारत जोडो यात्रेत 19 नोव्हेंबरला राहुल गांधींसोबत दिसणार फक्त महिला; जाणून घ्या कारण

काँग्रेसची भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात पोहोचली असून राज्याच्या विविध भागातून ती जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेसची भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात पोहोचली असून राज्याच्या विविध भागातून ती जात आहे.

Congress Bharat Jodo Yatra : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या जयंतीनिमित्त 19 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या भारत जोडो यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासोबत फक्त महिला (Women) असणार आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी आज (गुरुवार) ही माहिती दिली.

काँग्रेसची भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात पोहोचली असून राज्याच्या विविध भागातून ती जात आहे. नांदेडहून महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल झाल्यानंतर ही पदयात्रा आतापर्यंत हिंगोली आणि वाशीम जिल्ह्यातून पार पडली आहे. तर, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातून 20 नोव्हेंबरला मध्यप्रदेशात प्रवेश करणार आहे.

देशाच्या कानाकोपऱ्यातून महिला होणार सहभागी

काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस जयराम रमेश यांनी अकोला जिल्ह्यातील वाडेगाव इथं माध्यमांशी बोलताना सांगितलं की, 19 नोव्हेंबरला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधींसोबत केवळ महिलाच पदयात्रेत सहभागी होणार आहेत. यात्रेच्या दोन्ही सत्रांना (दुपारच्या जेवणाआधी आणि जेवणानंतर) काँग्रेस आणि त्याच्या संलग्न शाखांच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित राहणार आहेत. त्या दिवशी महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागातून पक्षाच्या महिला लोकप्रतिनिधीही पदयात्रेत सहभागी होणार आहेत.

पदयात्रा 20 नोव्हेंबरला मध्य प्रदेशात होणार दाखल

तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबरला सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेनं गुरुवारी 71 व्या दिवसात प्रवेश केला. त्याचवेळी महाराष्ट्रातील यात्रेचा आज 11 वा दिवस आहे. गुरुवारी सकाळी 6 वाजता महाराष्ट्रातील पोटूर शहरातून यात्रेला सुरुवात झाली. ही यात्रा सायंकाळी बाळापूरहून निघून शुक्रवारी सकाळी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथं पोहोचणार आहे. त्यानंतर ही पदयात्रा 20 नोव्हेंबरला मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) दाखल होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची दांडी, IIM जम्मूने ५०० रुपये दंडाची पाठवली नोटीस

Coastal Road Accident: BMW फ्लायओव्हरवरून खाली कशी कोसळली? धक्कादायक घटनेचा CCTV व्हायरल

UPI Transaction Fee : ऑनलाइन व्यवहारांना लागणार ब्रेक? केंद्र सरकारच्या निर्णयामुळं शेतकऱ्यांना बसणार लाखो रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड, UPI शुल्क बदलामुळं वाढली चिंता

SMRITI MANDHANA: सुजी बेट्सला मागे टाकलं अन् स्मृती मंधानाने रचला इतिहास! महिला T20I मध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली

Vastu Benefits of Shankh: घरात शंख ठेवण्याचे 'हे' आहेत फायदे; वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या शंखाचा योग्य प्रकार अन् दिशा!

SCROLL FOR NEXT