Rahul Gandhi Viral Video sakal
देश

Bharat Jodo Yatra : 52 वर्षी राहुल गांधींच्या पुशअप्स; लहानग्यासोबत लावली स्पर्धा

त्यांच्यासोबत असलेल्या अनेक नेत्यांनी दमून हार मानली.

सकाळ डिजिटल टीम

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सुरू झाली आणि सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू झाली. गेल्या एक महिन्यांपासून सुरू असलेल्या यात्रेतले अनेक फोटो व्हिडीओ, सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कधी लहान मुलांसोबत खेळताना, तर कधी आईच्या शूजची लेस बांधतानाचे फोटो समोर येतात. असाच एक व्हिडीओ आता समोर आला आहे.

भारत जोडो यात्रेमधल्या या व्हिडीओमध्ये राहुल गांधी चक्क पुशअप्स मारताना दिसत आहे. यामध्ये त्यांच्यासोबत काँग्रेसचे नेते डी.के.शिवकुमार हेही आहेत. एका बाजूला ५२ वर्षीय राहुल गांधी आहेत तर दुसऱ्या बाजूला एक लहान मुलगा पुशअप्स करत आहे. पण त्यांच्यासोबत असलेले शिवकुमार आणि केसी वेणुगोपाल यांना फार काळ पुशअप्स मारायला जमलेलं नाही, असं दिसतंय.

राहुल गांधी देशभरात ही भारत जोडो यात्रा करत आहेत. या यात्रेला आबालवृद्धांचा प्रतिसाद मिळत आहे. आणखी एका व्हिडीओमध्ये एक लहानगा सुरक्षा यंत्रणा भेदून राहुल गांधींजवळ येतो आणि त्यांचा पापा घेतो, असं दिसत आहे. यावेळी सचिन पायलट आणि काँग्रेसचे इतर नेतेही गांधी यांच्यासोबत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अजितदादांचं जाणं अविश्वसनिय! दमदार आणि दिलदार मित्र गमावल्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची भावना

'महाराष्ट्राच्या राजकीय जीवनातील काळा दिवस, अजित पवारांशिवाय राज्याचं राजकारण बेचव आणि अळणी'; संजय राऊतांनी व्यक्त केलं दु:ख

Ajit Pawar Death News LIVE Updates: माझा मोठा भाऊ गेल्याची भावना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

'गतिमान आणि ठाम नेतृत्व करणारा नेता...' अजितदादांबद्दल पोस्ट लिहिताना भावूक झाला रितेश देशमुख

Ajit Pawar Passed Away : अजित पवार यांची निधनाच्या काही मिनिटं आधी सोशल मीडियावर पोस्ट, काय म्हणाले होते ?

SCROLL FOR NEXT