Bhim Army chief Chandrashekhar Azad Detained
Bhim Army chief Chandrashekhar Azad Detained Bhim Army chief Chandrashekhar Azad Detained
देश

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर विमानतळावर ताब्यात; पीडित कुटुंबाची भेट नाकारली

सकाळ डिजिटल टीम

Bhim Army chief Chandrashekhar Azad Detained जोधपूर : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद (Chandrashekhar Azad) यांना जोधपूर विमानतळावर ताब्यात घेण्यात आले आहे. शाळेतील शिक्षकाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झालेल्या अनुसूचित जातीतील मुलगा इंद्र कुमार याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी चंद्रशेखर जालोरला जात होते. राजस्थान पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा हवाला देत चंद्रशेखर यांना ताब्यात घेतले आहे.

राजस्थानमधील जालोर जिल्ह्यात इंद्र कुमार या विद्यार्थ्याचा शिक्षकाच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. ही घटना जिल्ह्यातील सायला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुराणा गावातील खाजगी शाळेत घडली. विद्यार्थ्याने खासगी शाळेच्या संचालकाच्या भांड्यातून पाणी पिले होते. या कारणावरून त्याला बेदम मारहाण करण्यात आली होती.

मारहाणीमुळे (beating) विद्यार्थ्याला अंतर्गत जखमा झाल्या. कुटुंबीयांनी त्याला प्रथम स्थानिक रुग्णालयात दाखल केले. नंतर अहमदाबादला नेले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. इंद्र कुमार हा सुराणा गावातील सरस्वती विद्या मंदिरात इयत्ता तिसरीत शिकत होता. या प्रकरणी मृत विद्यार्थ्याचे काका किशोर कुमार यांनी सायला पोलिस ठाण्यात शाळेचा संचालक छैल सिंग याच्याविरुद्ध मारहाण, जातिवाचक शब्द वापरणे, अपमानित करून विद्यार्थ्याची हत्या केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

कानाला आणि डोळ्याला अंतर्गत जखमा

२० जुलै रोजी इंद्र नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. तहान लागल्यावर त्याने शाळेत ठेवलेल्या पाण्याच्या भांड्यातून पाणी प्यायले. मात्र, तो मटका शिक्षक छैल सिंगसाठी वेगळा ठेवला होता. याची माहिती मिळताच ऑपरेटरने मुलाला मारहाण केली. त्याच्या उजव्या कानाला आणि डोळ्याला अंतर्गत जखमा झाल्या. विद्यार्थ्याने वडिलांना याची माहिती दिली. मात्र, १३ ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान इंद्राचा मृत्यू झाला.

खासगी शाळेच्या संचालकाला अटक

पोलिसांनी एससी-एसटी कायद्यासह खुनाचा गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे. त्याचवेळी पोलिसांनी खासगी शाळेच्या संचालकालाही अटक केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्य गटशिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशी समितीही स्थापन केली आहे. जारी केलेल्या नोटीसमध्ये सरस्वती विद्या मंदिरातील शिक्षकाने मुलाला मारहाण केल्याची घटना समोर आली असून, वस्तुस्थितिदर्शक अहवाल पाठवण्याचे आदेश दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : शंभूराज देसाई यांनी बजावला मतदानाचा हक्क!

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Latest Marathi News Live Update: अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावनी सुरू; थोड्याच वेळात फैसला

Shekhar Suman: हिरामंडी फेम अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT