Sudha Bharadwaj Released sakal media
देश

Bhima Koregaon Case: सुधा भारद्वाज यांना जामीन; तब्बल तीन वर्षांनी कोर्टाकडून सुटका

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: भीमा-कोरेगांव प्रकरणी (Bhima Koregaon Case) गेल्या तीन वर्षांपासून तुरुंगात असणाऱ्या वकील आणि कार्यकर्त्या सुधा भारद्वाज (Sudha Bharadwaj) यांची आज गुरुवारी भायखळा तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. भारद्वाज यांना एल्गार परिषद-नक्षलवाद्यांच्या संबंधाप्रकरणी मुंबई हायकोर्टाने जामीन दिला आहे. स्पेशल एनआयए (NIA) कोर्टाने (NIA Special Court) बुधवारी म्हटलं होतं की, सुधा भारद्वाज यांना 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सोडण्यात येईल.

कोर्टाने ही सुटका करताना त्यांच्यावर काही शर्ती लादल्या आहेत. यामध्ये विना परवानगी मुंबईच्या बाहेर न जाणे तसेच पासपोर्ट जमा करण्याचे आदेश आहेत. याशिवाय स्पेशल कोर्टाने त्यांना UAPA अंतर्गत दाखल केल्या गेलेल्या FIR प्रमाणे बेकायदेशीर बाबींमध्ये पुन्हा न गुंतण्याची ताकीद देखील दिली आहे. 2018 साली झालेल्या भीमा कोरगाव हिंसा प्रकरणी अनेकांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी एक सुधा भारद्वाज या होत्या. त्यांना जामीन मंजूर झाला होता. मात्र, जामीनाच्या शर्ती निश्चित झाल्या नव्हत्या. हायकोर्टाने जामीनाच्या शर्ती निश्चित करण्यासाठी आठ डिसेंबर रोजी सुधा भारद्वाज यांना एनआयएच्या स्पेशल कोर्टामध्ये हजर करण्याचे आदेश दिले होते. या दरम्यानच तपास यंत्रणेने सुधा भारद्वाज यांच्या जामीनाविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती.

तांत्रिक अडचणीच्या कारणावरून जामीन मिळालेल्या १६ कार्यकर्त्यांपैकी सुधा भारद्वाज या भीमा कोरेगांव प्रकरणातील पहिल्या आरोपी आहेत. कवी आणि कार्यकर्ता वरवरा राव हे सध्या वैद्यकीय कारणांवरुन जामीनावर बाहेर आहेत. याप्रकरणी सहआरोपी सुधीर ढवळे, वरवरा राव, रोना विल्सन, सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत, वर्णन गोंजल्विस आणि अरुगण फरेरा यांच्याद्वारे दाखल करण्यात आलेल्या जामीनाच्या याचिका रद्द करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: अक्षय तृतीयेआधी सोनं महागलं! चांदीही चमकली; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

Temple Tourism: पांडवांनी स्थापन केलेले मंदिर आता जगभरात गाजणार! सरकारकडून १ कोटींचा निधी मंजूर; स्वयंभू शिवलिंगाचे रहस्य काय?

Global Conflict: युद्धाचा तिढा कायम- पण निष्फळ वाटाघाटी पुन्हा सुरू?

kolhapur Danoli killing case : दानोळी २५ लाखांच्या अपहरण करून खून प्रकरणाला नवे वळण; एकावर डोळा, दुसऱ्यावर गेम, गुप्तांगाला दिला विजेचा शॉक

Pune Airport: पुणे विमानतळ धावपट्टीचे काम पावसाळ्यानंतरच; उन्हाळी हंगामामुळे दुरुस्ती लांबणीवर, ‘नोटम’ कालावधीत काम होणार!

SCROLL FOR NEXT